esakal | खुशखबर! SBI बॅंकेत 92 पदांसाठी मोठी भरती
sakal

बोलून बातमी शोधा

खुशखबर! SBI बॅंकेत 92 पदांसाठी मोठी भरती

खुशखबर! SBI बॅंकेत 92 पदांसाठी मोठी भरती

sakal_logo
By
सकाळ टीम

सातारा : SBI Recruitment 2021 : एसबीआयमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नियमित व कराराच्या आधारे लिपिक संवर्गातील विशेषज्ञ केडर अधिकारी (एससीओ) आणि फार्मासिस्टच्या 92 पदांसाठी भरतीची नुकतीच जाहिरात प्रसिध्द केली आहे. बँकेने जाहीर केलेल्या सहा वेगवेगळ्या भरती जाहिरातीअंतर्गत विविध पदांच्या अर्जाची प्रक्रिया आज 13 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आहे. ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर आपला ऑनलाइन अर्ज भरु शकतात. दरम्यान, सर्व पदांच्या अर्जासोबत उमेदवारांना 3 मेपर्यंत विहित अर्ज फी भरावी लागेल.

असा भरा अर्ज..

अर्जासाठी उमेदवाराने एसबीआयच्या वेबसाइटला भेट दिल्यानंतर, वेबसाइटमधील करिअर विभागास भेट द्यावी. त्यानंतर संबंधित भरती जाहिरातींसह प्रदान केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करून आपण अर्ज मुख्य पृष्ठावर भरु शकता.

या पदांसाठी होणार भरती

फार्मासिस्ट - 67 पदे

उप सीटीओ - 1 पद

व्यवस्थापक (इतिहास) - 2 पदे

मुख्य इथिक्स अधिकारी - 1 पद

सल्लागार - 4 पदे

उपव्यवस्थापक - 1 पद

डेटा विश्लेषक - 8 पदे

व्यवस्थापक - 1 पद

व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक) - 2 पदे

वरिष्ठ विशेष कार्यकारी - 1 पद

वरिष्ठ विशेष कार्यकारी (रणनीती टीएमजी) - 1 पद

वरिष्ठ विशेष कार्यकारी (जागतिक व्यापार) - 1 पद

वरिष्ठ कार्यकारी (सहाय्यक) - 1 पद

वरिष्ठ कार्यकारी (वित्त) - 1 पद

वरिष्ठ कार्यकारी (विपणन) - 1 पद