MPSC AO Recruitment 2022
MPSC AO Recruitment 2022Sakal

MPSC प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती, असा करा अर्ज

MPSC AO Recruitment 2022: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (MPSC) अधिकारी पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार अंतर्गत विभागांमध्ये प्रशासकीय अधिकारी पदांवर नियूक्ती केली जात आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने प्रशासकिय अधिकारीच्या एकूण ७३ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहे.

ही पदे सामान्य राज्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील (General State Services and Public Health Department) रिक्त गट-ब पदांसाठी भरतीसाठी आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 21 मार्च 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना MPSC,च्या अधिकृत वेबसाइटला mpsc.gov.in भेट द्यावी लागेल.

MPSC AO Recruitment 2022
मदरशांच्या शाळेत यापुढे 'राष्ट्रगीत' असणार बंधनकारक : मदरसा बोर्ड

MPSC AO Recruitment 2022साठी शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधरची पदवी किंवा त्याच्या समकक्ष मान्यताप्राप्त पात्रता असावी. त्याच वेळी, उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याला मराठी बोलता, वाचता आणि लिहिता आले पाहिजे. शैक्षणिक पात्रता आणि पात्रता अटींबद्दल अधिक माहितीसाठी, MPSC वेबसाइटवरील अधिकृत अधिसूचना पहा.

MPSC AO Recruitment 2022 अर्जासाठी वयोमर्यादा

MPSC ने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या विविध श्रेणींच्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 40 वर्षे, OBC साठी 18 ते 43 वर्षे आणि ST, SC साठी 18 ते 45 वर्षेपर्यंत वयोमर्यादा निश्चत केली आहे. वरील वयोमर्यादेमधील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

MPSC AO Recruitment 2022
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात नोकरीची संधी

MPSC AO Recruitment 2022: महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज शुल्क

अर्ज भरण्याची सुरूवात तारीख - 21 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 एप्रिल 2022

MPSC AO Recruitment 2022 अर्ज शुल्क

सर्वसाधारण, ओबीसी वर्ग उमेदवारांसाठी - 719 रुपये

तर, SC, ST वर्ग उमेदवारांसाठी - 449 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com