
Bank Job : या बँकेत सुरू झाली आहे भरती; गलेलठ्ठ पगार घेण्याची संधी
मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बँक जॉबसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीद्वारे एकूण १४७ पदे भरली जातील. अर्ज करण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. (recruitment in central bank of india)
अर्जाची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून उमेदवारांना १५ मार्चपर्यंतच वेळ देण्यात येणार आहे. हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
रिक्त जागांचा तपशील
या सेंट्रल बँक भरतीद्वारे एकूण १४७ पदे भरण्यात येणार आहेत. पदांची तपशीलवार माहिती भरती अधिसूचनेमध्ये पाहाता येईल.
महत्त्वाची तारीख
२८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
सेंट्रल बँकेतील व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बी.टेक किंवा बीई पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा
सर्व पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादा स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क म्हणून रु. 1,000 + 18% GST भरावा लागेल. SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया
व्यवस्थापक पदांवर निवड होण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. ज्या उमेदवारांची ऑनलाइन चाचणीत निवड होईल त्यांना मुलाखतीला बोलावले जाईल.