Job Alert | १०वी उत्तीर्णांची नौदलात भरती; ६० हजारांहून अधिक पगार घेण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian navy

Job Alert : १०वी उत्तीर्णांची नौदलात भरती; ६० हजारांहून अधिक पगार घेण्याची संधी

मुंबई : भारतीय नौदलाने ट्रेडसमन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण २४८ पदे भरली जातील.

या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२३ आहे. (indian navy recruitment)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 248

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 7 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 मार्च 2023

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही उमेदवाराकडे 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेचे समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांनी संबंधित विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केलेला असावा.

वय मर्यादा

भारतीय नौदलाच्या या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करणार्‍या सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवावे की त्यांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असावी. म्हणजेच उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. लक्षात घ्या की राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 205 रुपये भरावे लागतील, तर SC, ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

निवड झालेल्या सर्व उमेदवारांना वेतनश्रेणी स्तर २ नुसार १९,९०० ते ६३,२०० रुपये दिले जातील.