Jobs : युनियन बॅंकेत एसओ, डोमेन एक्‍सपर्ट अन्‌ इतर पदांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युनियन बॅंकेत होणार व्यवस्थापक पदांसाठी भरती
युनियन बॅंकेत एसओ, डोमेन एक्‍सपर्ट अन्‌ इतर पदांची भरती

युनियन बॅंकेत एसओ, डोमेन एक्‍सपर्ट अन्‌ इतर पदांची भरती

सोलापूर : युनियन बॅंकेत सरकारी नोकरीसाठी (Jobs) भरतीची (Recruitment) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी. युनियन बॅंकेने (Union Bank Of India) तज्ज्ञ अधिकारी (Specialist Officer -SO) आणि डोमेन एक्‍स्पर्टच्या (Domain Expert) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॅंकेने 22 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, डिजिटल (Digital), ऍनालिटिक्‍स (Analytics), इकॉनॉमिस्ट (Economist), Research API Management, डिजिटल लेंडिंग (Digital Lending) आणि फिनटेक टीममधील (Fintech teams) विविध पदांच्या एकूण 25 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की युनियन बॅंकेने जाहिरात केलेल्या स्पेशालिस्ट ऑफिसर आणि डोमेन एक्‍स्पर्टच्या पदांसाठीची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. (Recruitment of SO, Domain Expert and other posts in Union Bank)

हेही वाचा: मुलीच्या लग्नाचं वय वाढल्यानंतर सुकन्या योजनेतही होणार बदल?

असा करा अर्ज

युनियन बॅंक स्पेशालिस्ट ऑफिसर आणि डोमेन एक्‍स्पर्ट रिक्रूटमेंटसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर भरती विभागात दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन ऍप्लिकेशन पेजला भेट देऊ शकतात. ऍप्लिकेशन पेजवर उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून, उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील. अर्जादरम्यान उमेदवारांना 850 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तथापि, SC, ST व दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क फक्त 150 रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2022 आहे.

हेही वाचा: नववर्षात होतील 'हे' मोठे बदल, ज्याचा परिणाम होईल थेट तुमच्या खिशावर

पदनिहाय रिक्त पदांची संख्या

 • वरिष्ठ व्यवस्थापक (डिजिटल) : 1 पद

 • व्यवस्थापक (डिजिटल) : 1 पद

 • व्यवस्थापक - डेटा सायंटिस्ट : 2 पदे

 • व्यवस्थापक - डेटा विश्‍लेषक : 2 पदे

 • व्यवस्थापक - सांख्यिकीतज्ज्ञ : 2 पदे

 • व्यवस्थापक - डेटाबेस प्रशासक : 1 पद

 • वरिष्ठ व्यवस्थापक (अर्थशास्त्रज्ञ) : 2 पदे

 • व्यवस्थापक (अर्थशास्त्रज्ञ) : 2 पदे

 • वरिष्ठ व्यवस्थापक (उद्योग संशोधन) : 2 पदे

 • व्यवस्थापक (उद्योग संशोधन) : 2 पदे

 • वरिष्ठ व्यवस्थापक (API) : 2 पदे

 • व्यवस्थापक (API) : 2 पदे

 • वरिष्ठ व्यवस्थापक (डिजिटल लेंडिंग आणि फिन टेक) : 2 पदे

 • व्यवस्थापक (डिजिटल लेंडिंग आणि फिन टेक) : 2 पदे

Web Title: Recruitment Of So Domain Expert And Other Posts In Union Bank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..