
Mental Health and Exams: दहावी-बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या आणि त्यांच्या वर्गात चांगले प्रदर्शन करण्याच्या पालकांच्या दबावामुळे अनेकदा मुलांवर तणाव येतो. परीक्षेच्या काळात येणाऱ्या या तणावाचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यातून निकाल कमी येण्याचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांना परीक्षेच्या ताणापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल पाथ्रीकर यांनी दिला आहे.