
दोस्तांनो, एक वर्ष म्हणजे तब्बल ३६५ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावर आपण आता नवीन वर्षात प्रवेश करत आहोत. या टप्प्यावर गेल्या वर्षात आपण काय केलं? काय राहून गेलं? याचा आढावा घेऊन आगामी वर्षात आपण काय करणार आहोत? याचं नियोजन करणं महत्त्वाचं ठरतं. अभ्यासाचे आणि एकूणच वर्षभरात आपण काय काय करणार आहोत याचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे पाहूया -