‘बायोपॉलिमर्स’ची व्यापकता

बायोपॉलिमर्स हे शाश्वत, जैवविघटनशील आणि जैवसुसंगत मटेरिअल्स म्हणून शेती, अन्नपदार्थ आणि वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या क्षेत्रातील संशोधनामुळे पर्यावरणपूरक उपाय, आधुनिक उपचार पद्धती आणि नव्या करिअर संधी उपलब्ध होत आहेत.
Role of Biopolymers in Agriculture and Food Packaging

Role of Biopolymers in Agriculture and Food Packaging

sakal

Updated on

डॉ. राजेश ओहोळ ( करिअर मार्गदर्शक)

संशोधनाच्या वाटा

लीकडच्या वर्षांत बायोमेडिकल अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उतींचे पुनरुत्पादन वाढविण्यासाठी किंवा उपचारात्मक परिणाम सुधारण्यासाठी नवीन उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या नवीन विकासातील एक प्रमुख घटक म्हणजे ‘पॉलिमर मटेरिअल’ होय. पॉलिमर नैसर्गिक, कृत्रिम किंवा मिश्रित फॉर्म्युलेशन या प्रकारांमध्ये विभागले जाते. पॉलिमरच्या गुणधर्मामुळे आणि कार्यक्षमतेमुळे ते आदर्श मटेरिअल्समध्ये रूपांतरित करता येते. अशा आदर्श मटेरिअल्सचा उती अभियांत्रिकीसाठी, औषध वितरणप्रणाली आणि स्कॅफोल्ड डिझाइन इत्यादी बाबींसाठी उपयोग होतो. नैसर्गिक बायोपॉलिमर्स आरोग्यसेवा आणि औषधांच्या क्षेत्रात उपयुक्त आहेत. बायोपॉलिमर नैसर्गिकरीत्या उद्‍भवणारे मॅक्रोमॉलिक्युल आहेत. त्यांची अंतर्गत जैवविघटनशीलता, सुसंगतता आणि जीवाश्म संसाधनांवरील कमी अवलंबित्व यामुळे ते पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्वाचा पर्याय ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com