esakal | केंद्राचा मोठा निर्णय! मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी EWS,OBC ना मिळणार आरक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

 Narendra modi

केंद्र सरकारने मेडिकल पदवी आणि पदव्युत्तर, डेंटल कोर्सेसमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी EWS,OBC ना मिळणार आरक्षण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मेडिकल पदवी आणि पदव्युत्तर, डेंटल कोर्सेसमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयायाने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार या शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी ओबीसींना 27 टक्के आणि EWS साठी 10 टक्के आरक्षण दिले जाईल. आरक्षणाचा लाभ मेडिकल पदवी, पदव्युत्तर पदवी, डेंटल कोर्ससाठी घेता येईल. यामध्ये MBBS, MD, MS, Diploma, BDS, MDS या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

हेही वाचा: Goa Rape Case: 'मुली रात्रभर बीचवर कशासाठी?' मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाने खळबळ

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 12 जुलै रोजी NEET परीक्षेच्या तारखांची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, यावेळीसुद्धा नीट परीक्षा ओबीसींना आरक्षण न देताच होणार आहेत. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यी संघटनांनी देशव्यापी संपाचा इशारा दिला होता. तसंच अनेक राजकीय पक्षांनी आरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर भाजपचे नेतेसुद्धा आरक्षणाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय राज्य मंत्री अनुप्रिया पटेल आणि भूपेंद्र यादव यांनी पंतप्रधान मोदींकडे प्रस्ताव दिला होता.

loading image
go to top