
Career Tips : क्वालिफाइड असूनही या ३ कारणांमुळे हाऊ शकतात रिजेक्ट
Resons Behind Not Getting Job : बेरोजगारी आणि नोकरीचा शोध हा काळ फार त्रासदायक असतो. बऱ्याचदा शिक्षण असूनही नाकारले जातात. तुम्हाला सतत ऐकावं लागतं की, तुमच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसऱ्या योग्य व्यक्तीला घेण्यात आलं.
पण बऱ्याचदा हे कळत नसतं की, क्वालिफीकेशन असूनही नकार का येतो? याचं रहस्य तुम्ही इंटरव्युव्ह कसा देतात यात आहे. त्यामुळे स्वतः काही थोडे बदल केले तर यश नक्कीच मिळू शकतात.
हे ही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
क्वालिफीकेशन असूनही का दिला जातो नकार
तुम्ही क्वालिफाइड आहात पण बोअरींग आहात
याचा अर्थ तिथे तुम्हाला कोणाचं मनोरंजन करायचा असा होत नाही. पण नुसती डिग्री असून भागत नाही. नवीन काही शिकण्याची तयारी, उत्सुकता आणि उत्साह तुमच्या उत्तरांतून आणि देहबोलीतून जाणवणं गरजेचं आहे. जर तुमचा अॅट्यूड ताठर असेल तर असे लोक स्वीकारले जात नाहीत.
क्वालिफीकेशन आहे पण मुलाखत कौशल्य नाही
तुमच्याकडे शिक्षण अनुभव असेल पण मुलाखत कौशल्य नसेल तरीही तुम्ही नकारले जातात. तुम्ही किती काम केलं किंवा करू शकतात त्यापेक्षा ते तुम्ही योग्य वेळ आली की, कसे मांडता हे आवश्यक आहे. असाच मुद्दा मुलाखतीच्या वेळी येतो. मुलाखतीच्या वेळचं तुमचं बोलणं, वागणं आणि सादरीकरण जर योग्य नसेल तर तुमचा प्रभाव पडत नाही.
क्वालिफाइड आहात पण डेस्परेट असाल तर...
जर तुम्ही मुलाखतीत असं दाखवलं की, तुम्हाला या नोकरीची किती गरज आहे, हा तुमचा ड्रीम जॉब आहे वगैरे तर हे सुध्दा तुमचं इंप्रेशन खराब करू शकतं. या ऐवजी तुम्ही आधीचा जॉब का सोडलात किंवा सोडत आहात आणि नवीन जॉब का शोधत आहात याची मुद्देसुद खरी कारणं दिलीत तर ते अधिक प्रभावी ठरतं.