SSC and HSC Board
SSC and HSC BoardSakal

बारावी निकालाचे कोडे अखेर सुटले; 'असा' लागणार निकाल

Published on

पुणे : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच्या निकालाचे निकष काय असतील, याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्टता नव्हती. आता राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी निकालाचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. सीबीएसई मंडळाप्रमाणे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या सूत्रावर आधारित असणार आहे.

बोर्डाच्या परीक्षेशिवाय बारावीचा निकाल लावण्याचे कोडे राज्य सरकारने अखेर सोडविले आहे. ३० टक्के दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील मिळालेले गुण, ३० टक्के अकरावीच्या अंतिम परीक्षेचे गुण आणि ४० टक्के बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनातील गुण, यानुसार बारावीचा निकाल लावला जाणार आहे. एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 याच फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

SSC and HSC Board
राहुल गांधींची नेमकी अडचण काय आहे? लसीकरणावरील टीकेमुळे आरोग्यमंत्री संतप्त

असे होणार मूल्यमापन

  • दहावी परीक्षेतील सर्वांत जास्त गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण (30%)

  • 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयानुसार गुण (30%)

  • 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि तत्सम मूल्यमापन गुण (30%)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com