अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MHT CET result

राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.

अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर

पुणे - राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पीसीएम गटात १३ आणि पीसीबी गटात १४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत.  त्यातील पीसीबी गटात पुण्यातील शुभम गटकळ आणि वसुधा फडतरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या परीक्षेसाठी एकूण सहा लाख पाच हजार ९४४ विद्यार्थ्यांनी पीसीएम आणि पीसीबी ग्रुपसाठी नोंदणी केली. तर त्यातील चार लाख ६७ हजार ३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

राज्यातील ३६ जिल्ह्यांची २२७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने १३ दिवसांत २५ सत्रांमध्ये घेण्यात आली. यंदा जवळपास एक लाख ३८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही परीक्षा दिली नाही. तब्बल २२.८७ टक्के विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तर ७७.१३ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जातो. या परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ऑनलाइनद्वारे जाहीर करण्यात आला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल स्वत:च्या लॉगिनमधून ‘www.mahacet.org’ आणि ‘http://mhtcet2022.mahacet.org/StaticPages/HomePage’ या संकेतस्थळावर स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

Web Title: Result Of Mht Cet Taken For Engineering And Pharmacy Courses Declared Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..