संधी नोकरीच्या... : फॅशन डिझायनिंग : क्रिएटिव्ह, ग्लॅमरस

फॅशन डिझायनिंग हे आजच्या जगातील सर्वांत क्रिएटिव्ह, ग्लॅमरस, रोमांचक करिअर आहे. फॅशन डिझायनर बनण्यासाठी भरपूर संयम, चिकाटी, कठोर मेहनत घ्यावी लागते.
Deepika Padukone
Deepika PadukoneSakal

अगं काल दीपिका पदुकोणला पाहिलेस का? किती सुंदर ड्रेस होता तिचा! आणि रणवीर सिंगने तर किती कलरफुल ड्रेसिंग केलं होत ना! ही अशी वाक्ये आपल्या कानावर कायम पडत असतात. पण जे समोर दिसते त्या मागचे खरे शिल्पकार आहेत तरी कोण? तर ते आहेत फॅशन डिझायनर्स.

फॅशन डिझायनिंग हे आजच्या जगातील सर्वांत क्रिएटिव्ह, ग्लॅमरस, रोमांचक करिअर आहे. फॅशन डिझायनर बनण्यासाठी भरपूर संयम, चिकाटी, कठोर मेहनत घ्यावी लागते. भरभराटीच्या फॅशन उद्योगाने जगभरातील प्रशिक्षित फॅशन डिझायनर्सची मागणी वाढली आहे.

भारतातील अव्वल फॅशन डिझायनिंग संस्था विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसाठी प्रशिक्षण देत आहेत. यशस्वी पदवीधर फॅशन डिझायनर, टेक्स्टाईल डिझायनर, व्हिज्युअल मर्चंडाइजर्स, फॅशन्स मार्केटर्स इत्यादी बनू शकतात. पदवी, पदव्युत्तर आणि अल्पकालीन अभ्यासक्रम विविध संस्थांद्वारे दिले जातात. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्यापाराच्या युक्त्या शिकण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करतात. हे त्यांना मूळ डिझाइन तयार करण्याचे, नवीन फॅशन ट्रेंडची संकल्पना तयार करण्याचे आणि नावीन्यपूर्ण विचार करण्याचे प्रशिक्षण देतात.

शिक्षणाच्या संधी

भारतातील टॉप फॅशन डिझायनिंग संस्था वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम चालवतात. व्यावसायिक फॅशन डिझायनर होण्यासाठी डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट, पोस्ट-ग्रॅज्युएट आणि विकएण्ड क्लासेस करता येतात. कोर्ससाठी मूलभूत पात्रता १०+२ आहे, ती निवडलेल्या कोर्सनुसार बदलते. संस्था आणि आवडीच्या क्षेत्रानुसार, आपण अनेक अभ्यासक्रमांमधून निवडू शकता.

येथे नोकरी मिळेल

Shoppers Stop, Raymonds, Arvind, Cotton king, Pantaloon, Globus,W, Biba, Petter England, Levis, Amazon, Snapdeal, Myntra, Ajio, Sabyasachi Mukherjee, Rohit Bal, Manish Malhotra, Rahul Mishra इत्यादी.

लोकप्रिय करिअरची यादी

  • Fashion Designer/Assistant Designer

  • Fashion Show Organizers

  • Technical Designer, Fashion Consultant

  • Fashion Concept Manager

  • Fashion Marketer

  • Quality Controller

  • Fashion Coordinator

  • Costume Designer

  • Fashion Consultant

  • Fashion Forecaster

  • Fashion Entrepreneur

  • Fashion Stylist

  • Fashion Photographer

  • Production Supervisor

  • Fashion Merchandiser

  • Quality Supervisor and Costume designer

  • Pattern Designer

  • Pattern Maker

  • Fashion Illustrator व Fashion Design lecturer/professor.

कोर्सेसची यादी

  • Diploma in Dress Designing and garment manufacturing

  • Diploma in Fashion Design and Construction

  • B. Sc in Fashion and Apparel Designing

  • B. Sc in Fashion Business and Retail Management

  • B. Des (Fashion Design)

  • B. Des (Textile Design)

  • B. Des (Leather Design)

  • B. Des (Knitwear Design)

  • B. Des (Apparel Production)

  • B. Des (Fashion Communication)

  • B. A. (Hons) Fashion Design

  • B. A. (Hons) Fashion Styling and Image Design

  • B. A. (Hons) Communication Design

  • MBA in Fashion Merchandising and Retail Management

  • MBA in Fashion Design and Business Management

  • MBA in Textile Management

  • M.Sc. in Fashion Designing

  • M. Des Fashion Designing

  • M. Des Textile Designing

फॅशन डिझायनिंग कॉलेजेस 

  • National Institute of Fashion technology (NIFT)

  • National Institute of Design (NID)

  • Amity Institute of Fashion technology

  • Pearl academy

  • Arch academy of design

  • MGM Institute of fashion design

  • School of Fashion technology (SOFT)

  • Symbiosis Institute of Design

  • MIT Institute of Design

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com