रेल्वेत 35 हजारांहून अधिक पदांसाठी भरती

Railway Recruitment Board
Railway Recruitment Boardesakal
Summary

रेल्वे भरती बोर्ड लवकरच NTPC परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

RRB NTPC Result 2021 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) लवकरच NTPC परीक्षेचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर rrbcdg.gov.in जाहीर करण्याची शक्यता आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसले होते, ते अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचा निकाल पाहू शकतात. ही परीक्षा (RRB NTPC Exam) 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सात टप्प्यांत घेण्यात आली.

रेल्वे बोर्ड 35,281 पदे भरण्यासाठी ही भरती करत आहे. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची तिकीट लिपिक, लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क आणि टाइमकीपर इत्यादी पदांसाठी निवड केली जाईल. तर, CBT 1 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना वेगळ्या टप्प्यातील परीक्षा द्यावी लागणार आहेत.

Railway Recruitment Board
उत्तर मध्य रेल्वेमध्ये होतेय क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांची भरती

RRB NTPC 2021 Result : असा करा 'निकाल' डाउनलोड

  1. सर्वप्रथम उमेदवाराने रेल्वे भरती बोर्डच्या (RRB) rrbcdg.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

  2. त्यानंतर मुख्यपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करावे.

  3. आता 'निकाल' पेजवर दिलेल्या RRB NTPC CBT 1 Result 2021 या लिंकवर क्लिक करावे.

  4. संपूर्ण तपशील भरल्यानंतर आता सबमिट बटण दाबा.

  5. आता RRB NTPC Result 2021 उमेदवाराच्या स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करा.

रेल्वे बोर्ड श्रेणीनुसार, स्कोअर कार्ड देखील जारी करू शकतं. हा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वे बोर्डाची वेबसाइट चेक करत राहणे जरुरीचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com