
- सचिन रावळे
औद्योगिक जैवतंत्रज्ञान हे नवनवीन तंत्रज्ञान संशोधन आणि औद्योगिक प्रगतीसह वेगाने वाढणारे औद्योगिक क्षेत्र आहे. सध्याच्या ‘न्यू नॉर्मल’च्या जगामध्ये पर्यावरण संवर्धनशी संबंधित उपायांबद्दल काळजी वाढल्याने या क्षेत्राला महत्त्व आले आहे.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन (NCBI)च्या म्हणण्यानुसार, औद्योगिक जैवतंत्रज्ञान पारंपरिक औद्योगिक प्रक्रियांमध्ये जैवतंत्रज्ञान साधनांचा वापर आणि नव्याने करण्यायोग्य संसाधनांपासून जैव आधारित उत्पादनांचाही समावेश करते. त्यामुळे आगामी काळ जैवतंत्रज्ञानाचा असेल. सहाजिकच त्यामुळे या क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणावर असणार आहेत.
जैवअर्थव्यवस्था हा औद्योगिक जैवतंत्रज्ञानाचा मुख्य आधार आहे. जैवऊर्जेवर आधारित उत्पादने, रसायने आणि साहित्य उत्पादनासाठी वापरली जाणारी, पुनर्निर्माण करता येणारी नैसर्गिक संसाधने वापरणारी ही ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था आहे.
बायोइकॉनॉमीमधील सध्याचे महत्त्वाचे कल लक्षात घेतल्यास हायड्रोकार्बन अर्थव्यवस्थेकडून कार्बोहायड्रेट आधारित अर्थव्यवस्थेकडे संक्रमणाचा समावेश त्यात होतो. हायड्रोकार्बनवर आधारित अर्थव्यवस्था जैवइंधनावर चालते आणि त्याचे घटक (व्युत्पन्न) पृथ्वीच्या पोटातून म्हणजे जमिनीच्या आतून काढण्यात आलेले असतात.
तर दुसरीकडे, कार्बोहायड्रेटवर आधारित अर्थव्यवस्था जैव आधारित उत्पादने, रसायने आणि घटकांवर कार्यरत असते. जैव इंधने हे ऊर्जेचे अपांरपरिक स्रोत आहेत आणि हवा, जल आणि मातीच्या प्रदूषणाला ते कारणीभूत ठरतात.
जैव इंधने आणि जैवरसायने हे ऊर्जेचे जैवआधारित शाश्वत स्रोत आहेतच. त्याशिवाय ते अधिक स्वच्छ आणि अधिक हरित ऊर्जा स्रोत आहेत. सध्या, जैव इंधनांच्या घटकांपेक्षा जैव आधारित पर्याय स्वीकारण्याचा वेग अर्थातच मंद आहे. परंतु लवकरच समाजाकडून हे पर्याय स्वीकारले जातील.
कमी कार्बन उत्सर्जित करणारे जैवइंधनाचे पर्याय बायोइकॉनॉमीमध्ये मिळत असल्याने, जमीन, हवाई आणि सागरी वाहतुकीमधल्या कार्बनीकरण कमी करण्यासाठीच्या क्षेत्रातील संधी वेगाने वाढत आहेत. पर्यावणाबद्दल वाढत्या चिंतेमुळे शाश्वत पर्यायांसाठीची गरजही वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक अक्षय्य रसायने आणि सामग्रीबाबतच्या असंख्य शक्यतांची दारेही उघडली जात आहेत.
इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचे प्रमाण २००३मध्ये ५ टक्के होते, ते २०२२मध्ये १० टक्के झाले आहे. त्यामुळे जैवइंधने आणि त्याच्या पूर्ण परिसंस्थेलाच उज्ज्वल भवितव्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गालाही चालना मिळणार आहे.
रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये उद्योजकतेचाही विकास होत आहे. २०२५ पर्यंत इथेनॉलमिश्रित २० टक्के होईल म्हणजे दरवर्षी १००० कोटी लिटर इथेनॉलची गरज लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचाच अर्थ असा की, भारतभरात अधिकाधिक इथेनॉल प्रकल्पांची आवश्यकता भासणार आहे.
परिणामी प्रत्यक्ष काम, देखभाल आणि प्रकल्प व्यवस्थापन यामध्ये रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. परवडण्यायोग्य वाहतुकीच्या दृष्टीने शाश्वत पर्यायाचा (SATAT) विचार करता, भारतभरात कंप्रेस्ड बायोगॅस उत्पादन करणारे प्रकल्प (प्लँट) उभारण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे अतिरिक्त रोजगारनिर्मिती होईल.
भविष्यात सगळ्याच परिसंस्थांमध्ये फ्लेक्स फ्युएल वाहनांची होणाऱ्या प्रवेशामुळे जैवइंधनांची मागणी आणखीनच वाढणार आहे आणि वाहन निर्मितीक्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत.
सध्या ‘प्राज’ने जमिनीवरील कार्बनीकरण कमी करण्यावर भर दिला आहे, अर्थात हवाई आणि सागरी वाहतूकीच्या क्षेत्रात ‘प्राज’ने याआधीच कार्बनीकरण कमी करण्यासाठीच्या दृष्टीने इंधन उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
शाश्वत हवाई इंधनांचा (SAF) आणि जैवसागरी इंधनांचा (BioMarine) नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे, या साखळीला सहाय्यभूत ठरणाऱ्या अतिरिक्त रोजगार संधीही विकसित होऊ शकतात.
औद्योगिक जेवतंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे जीवाश्म इंधनांच्या घटकांसाठी जैव आधारित पर्याय उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अक्षरश: असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. जैवअर्थव्यवस्थेचा स्वीकारल्यास समाज आणि पर्यावरणासाठीही सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.
या आहेत संधी
इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे प्रमाण २० टक्क्यांवर जाईल.
शेतकऱ्यांचा फायदा, नोकरीच्या नव्या संधी वाढतील.
कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांची संख्या वाढणार.
जैवअर्थव्यवस्था येऊ घातल्याने संशोधनात वाढ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.