विशेष : अभियांत्रिकी विद्याशाखा निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

engineering

सीईटी सेलच्या आकडेवारीवरून दिसून येते की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्राला पसंती दिलेली आहे.

विशेष : अभियांत्रिकी विद्याशाखा निवड

- प्रा. सागर चव्हाण

सीईटी सेलच्या आकडेवारीवरून दिसून येते की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्राला पसंती दिलेली आहे. चला तर मग आज जाणून घेऊया अभियांत्रिकीमध्ये विद्याशाखेची निवड कशी करावी. इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या विद्याशाखा याबद्दल माहिती नसते. बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा संगणक म्हणजेच कॉम्प्युटर इंजिनियरिंगकडे असल्याचे आढळून येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आयटी उद्योग क्षेत्रात नोकरी मिळण्याची इच्छा. परंतु कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले तरच आयटी क्षेत्रात नोकरी मिळते हा मात्र विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे.

आयटी क्षेत्र हे फक्त कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंगसाठी मर्यादित नसून ते इतर शाखांच्या विद्यार्थ्यांसाठीही खुले असते. कमिन्स, टीसीएस, डिओलाइट, विप्रो, कॅपजेमिनी अशा अनेक कंपन्यांमध्ये इतर शाखांच्या विद्यार्थ्यांनाही संधी असते.

अभियांत्रिकी आणि त्यासोबत निगडित उद्योग क्षेत्रात काही काळानंतर एखादी शाखा याची संधी वाढतो. हे एक चक्र आहे. कोरोनामुळे मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या क्षेत्रांमध्ये संधी कमी आहे, असे वाटत असला तरी आता सगळे सुरळीत सुरू झाल्यानंतर या क्षेत्राला परत गती येऊन याचा संधी नक्कीच वाढणार आहे.

आता जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतील त्यांचे शिक्षण २०२६मध्ये पूर्ण होईल. मात्र तोपर्यंत आता ज्या विद्याशाखेला संधी आहे ती कमी होईल आणि मेकॅनिकल आणि सिव्हिल सारखे क्षेत्रात ती वाढेल आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज कोणत्या गोष्टीला मागणी आहे हे न बघता आपले शिक्षण २०२६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर कोणत्या क्षेत्राला मागणी वाढेल आणि कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील याचा विचार करून अभियांत्रिकीमध्ये विद्याशाखेची निवड करावी.

सिव्हिल इंजिनिअरिंग यालाच नागरी शाखा असे म्हणून संबोधले जाते, कारण या क्षेत्रातल्या सर्व गोष्टी मानवाच्या मूलभूत गरजेनुसार आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचा उपयोग अनेक क्षेत्रांत केला जातो, जसे की इमारती बांधकामे, विमानतळ, पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम व वाहतूक, बोगदे बांधकाम, धरणे, जलसिंचन कामे आणि इतर कामे ज्यांची मानवी जीवनात गरज असते. त्यामुळे अभियांत्रिकीमध्ये शाखा निवडताना बहुपर्यायी म्हणजेच जास्तीत जास्त नोकरीच्या संधी असलेली शाखा, केवळ खासगी क्षेत्रात नव्हे तर शासकीय क्षेत्रातही नोकरी मिळेल, अशी शाखा निवडायला हवी.

विद्याशाखेसोबतच चांगले महाविद्यालय निवडणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात शैक्षणिक सुविधा आहे की नाही? महाविद्यालय नॅक अक्रिडिटेड आहे का? महाविद्यालयात चांगले प्लेसमेंट आहे का? आणि या याव्यतिरिक्त अनुभवी प्राध्यापकवृंद आहे का? हेसुद्धा पाहायला हवे.

Web Title: Sagar Chavan Writes Engineering Faculty Selection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobEngineering