
नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE 2025) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना 23 जानेवारी 2025 पर्यंत एनटीएच्या अधिकृत वेबसाइट www.ntaonline.in वर जाऊन अर्ज करू शकता. आधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2025 ठेवली होती, पण आता ती वाढवून 23 जानेवारी 2025 करण्यात आली आहे. तसेच, परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 ठेवली आहे.