'सकाळ एज्यु एक्स्पो'ला आजपासून सुरुवात

‘सकाळ एज्यु एक्स्पो’चे १० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; घरातूनच व्हा सहभागी
EDU EXPO
EDU EXPOSAKAL
Updated on

पुणे : घरात बसूनच लॅपटॉप, संगणक किंवा मोबाईलच्या साहाय्याने आपल्या दहावी-बारावी झालेल्या मुला-मुलींसाठी प्रवेश नेमका कोठे घ्यायचा, मुलांनी निवडलेल्या करिअरच्या मार्गावर जाण्यासाठी योग्य दिशा कोणती, याबाबत ‘सकाळ एज्यु एक्स्पो : २०२१’च्या व्यासपीठावरून मार्गदर्शन मिळू शकणार आहे. प्रवेश प्रक्रिया, करिअरच्या वेगवेगळ्या संधी याबाबत सर्व माहिती, तसेच विद्यार्थी-पालकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने या ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन १० ते १२ ऑगस्टदरम्यान केले आहे. आजपासून एज्यु एक्स्पोची सुरुवात होणार आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हे या मेळाव्याचे प्रमुख प्रायोजक आहेत. पदवी आणि पदव्युत्तर प्रोग्रॅमच्या माध्यामातून चांगल्या करिअरसाठी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या सहाय्याने तुमच्या कल्पनांसह भरारी घ्या. अप्लाय करण्यासाठी आजच भेट द्या पुढील संकेतस्थळाला : admissions.mitwpu.edu.in (sakal edu expo Give childrens careers right direction)

विद्यार्थी, पालक आणि देशातील नामांकित शैक्षणिक संस्था यांना व्हर्च्युअली जोडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी, बारावीनंतर चांगले करिअर करण्यासाठी नेमका प्रवेश कुठे आणि कसा घ्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसमोरही असतो. यासह शिक्षण, करिअरशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना आणि पालकांना या मेळाव्यात मिळणार आहेत. हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थी-पालकांना घरात बसूनच यात सहभागी होता येणार आहे.

EDU EXPO
Sakal Impact : खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन लागले कामाला

मेळाव्यातील ‘लाइव्ह वेबिनार’द्वारे विद्यार्थ्यांना विविध कोर्ससाठी सहभागी होता येईल. मेळाव्याद्वारे देशातील २५ नामवंत आणि अग्रगण्य अशा विद्यापीठांसमवेत जोडणे शक्य होणार आहे. यामध्ये एमआयटी-एडीटीयू, एनएमआयएमएस, एआयएसएसएमएस, अमृता विश्व विद्यापीठम्‌, टेक महेंद्रा फाउंडेशन, कनव्हे डॉट इन आणि ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई, ॲस्ट्युट ॲकॅडमी (फॉरेन लॅग्वेज टीचिंग ॲण्ड करिअर कौन्सिलर), शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विंग्ज कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी या विद्यापीठ आणि नामांकित संस्थांचा समावेश आहे.

मेळाव्याविषयी आधिक माहिती

कालावधी : १० ते १२ ऑगस्ट

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com