
Sakal Vidya Education Expo : बारामतीत 10 जूनपासून सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो...
बारामती : इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा संपली की विद्यार्थी व पालकांना वेध लागतात ते महाविद्यालयीन शिक्षण व पुढील करिअरची दिशा ठरवण्याचे अनेकदा विद्यार्थी व पालकांना नेमके कोणते महाविद्यालय निवडायचे किंवा कोणत्या करिअरची निवड करायची याबाबत निर्णय घेताना त्यांचा गोंधळ उडतो किंवा त्यांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही.
या काळामध्ये गरज असते ती ठरविलेल्या करिअर बाबत योग्य मार्गदर्शन व माहिती मिळण्याची, तसेच एक योग्य दिशा देणाऱ्या एका मार्गदर्शकाची. आयुष्याच्या या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर सकाळ माध्यम समूह सकाळ विद्या एज्युकेशन एक्सपो 2023 या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती मध्ये चिराग गार्डन येथे 10 व 11 जून रोजी यंदाचे सकाळ विद्या एज्युकेशन एक्सपो 2023 होणार आहे.
बारामती व पंचक्रोशीतील विविध नामांकित शिक्षण संस्थांना या प्रदर्शनामध्ये सहभागी होता येणार आहे. या प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित होणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेस तसेच केजी टू पीजी अभ्यासक्रमांसाठी येथे स्टॉलचे बुकिंग करता येणार आहे.
एकाच छताखाली सर्व माहिती
महाविद्यालयांसह इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासह दहावी बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या विविध दालनाची तसेच पर्यायांची माहिती, याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण,
वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझाइनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती व तंत्रज्ञान यासह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन यात असेल. यासोबतच जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षां बाबतही मार्गदर्शन करणा-या शैक्षणिक संस्था यात सहभागी होऊ शकतात. परदेशी शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या संधींबाबतही या प्रदर्शनादरम्यान मार्गदर्शन होऊ शकेल.
अधिक माहितीसाठी संपर्क
या शैक्षणिक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी, शिक्षण व करिअर बाबत मार्गदर्शन व आवश्यक माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खालील संपर्क नंबर वर तातडीने संपर्क करावा- दत्तात्रय- 8975673310, रमेश- 8208539942.