
‘डिजि’साक्षर : ‘5G’चे भविष्य आणि फायदे
- समीर आठल्ये
इंटरनेटचा स्पीड 5G तंत्रज्ञानामुळे जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्व सेवा सुविधांची कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. ई-लर्निंग, मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, शेती, रिमोट मेडिसिन, वाहतूक तसंच करमणूक क्षेत्रातील संधी आणि सुविधाही झपाट्याने वाढतील. याच प्रमाणे व्हर्चुअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटीसारखी तंत्रज्ञाने छोट्या डिव्हाइसेसवर सामान्य लोकांना उपलब्ध होतील. कुठल्याही तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास मनुष्याच्या फायद्याच्या अनेक गोष्टी निर्माण होतात.
5G तंत्रज्ञानातील अडचणी
5G तंत्रज्ञान हे हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालते. फ्रिक्वेन्सी जेवढी हाय तेवढी त्याची पेनिट्रेशनची क्षमता कमी होते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सिग्नल चांगला मिळण्यासाठी जास्त बुस्टर्स लावायला लागतील.
5G तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे मोबाईल फोन किंवा इतर डिव्हायसेस घ्यावे लागतील.
सुधारित इंटरनेट स्पीडमुळे चांगली बॅटरी लाइफ असणारे डिव्हायसेस घ्यावे लागतील.
या तंत्रज्ञानाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक ही बऱ्यापैकी जास्त आहे.
5G मधले धोके
चीन हा 5G साठी लागणाऱ्या इक्विपमेंट्सचा मोठा उत्पादक आहे. हुवाई ही त्यातली एक मोठी चीनी कंपनी आहे, परंतु अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपियन देशांना चिनी कंपन्या हेरगिरीसाठी या इक्विपमेंट्सचा वापर करतात अशी शंका आल्याने त्यांनी चिनी 5G इक्विपमेंट्सच्या वापराला बंदी घातली आहे. काही युरोपीय देशांनी आता नोकिया किंवा एरिक्सन या कंपन्यांना हे काम दिले आहे.
भारतात 5G नेटवर्क कधी सुरू होणार?
भारतातल्या मोबाईल सेवा देणाऱ्या सर्व मोठ्या कंपन्या 5G सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करत आहेत. सरकारकडून म्हणजेच दूरसंचार विभागातर्फे 5G स्पेक्ट्रमचे लिलाव मे, जून महिन्यात होतील. बाकी जिओ, एअरटेल या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार २०२२च्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात 5G सेवा सुरू होईल.
गेल्यावर्षी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी जिओ २०२१च्या उत्तरार्धात 5G सेवा भारतात सुरू करेल, असे सांगितले होते. परंतु 5G स्पेक्ट्रमचे लिलावच गेल्यावर्षी झाले नाहीत. त्या शिवाय जिओचे तंत्रज्ञान संपूर्ण भारतीय बनावटीचे असेल. जिओ आणि क्वालकॉम एकत्र या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.
पीएम वाणी
भारत सरकारने नुकताच पीएम वाणी नावाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम मंजूर केला. यामध्ये संपूर्ण देश वायफाय करणार आहेत. यामुळे लोकांना सगळीकडे सहज जलदगती इंटरनेट उपलब्ध होईल. पूर्वी PCOs असायचे तसंच आता PDOs (पब्लिक डेटा ऑफिसेस) असणार आहेत. त्यामुळे अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे. पंतप्रधानांनी देखील 5G सेवा लवकरात लवकर सुरू होईल.
Web Title: Samir Aathalye Writes 5g Future And Advantages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..