‘डिजि’साक्षर : ॲपद्वारे ऑनलाइन खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online-Purchasing

ई -कॉमर्स व्यवसाय भारतात प्रचंड प्रमाणात फोफावत आहे आणि अजून बरीच वर्ष फोफावत राहील. ई-कॉमर्स कंपन्यांची गरज आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाइन आणि त्यांच्या प्लॅटफॉर्म वरूनच खरेदी करावी.

‘डिजि’साक्षर : ॲपद्वारे ऑनलाइन खरेदी

- समीर आठल्ये

ई -कॉमर्स व्यवसाय भारतात प्रचंड प्रमाणात फोफावत आहे आणि अजून बरीच वर्ष फोफावत राहील. ई-कॉमर्स कंपन्यांची गरज आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाइन आणि त्यांच्या प्लॅटफॉर्म वरूनच खरेदी करावी. अनेक जण ऑनलाइन खरेदी करायचं टाळतात कारण त्यांना वस्तू विकत घेताना काळजीपूर्वक बघून घ्यायची असते. कपडे घेत असतील तर त्यांना ते आपल्याला नीट बसतात का याची खात्री करून घ्यायची असते. घरात फर्निचर घ्यायचं असेल तर त्याचं लाकूड, त्या वस्तूचा आकार आणि आपल्या घरातल्या खोल्यांचा आकार याचा अंदाज घ्यायचा असतो. हीच गोष्ट दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत असते.

तरुण किंवा नवीन ग्राहक ज्यांना पारंपारिक पद्धतीने खरेदी करायचा अनुभव नसतो, ते ग्राहक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स सहज वापरायला लागलेत. पण ई-कॉमर्स कंपन्यांना जास्त लोकांनी ऑनलाइन खरेदी करावी यासाठी वर दिलेल्या अडचणींवर मात करावी लागते.

या अडचणींवर मात करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स वेगवेगळ्या क्लृप्त्या करतात. त्यातल्या काही म्हणजे...

1) ऑगमोंटेड रिॲलिटी

2) चॅटबॉट्स

3) व्हॉइस सर्च

आणि अशा अनेक गोष्टी अॕमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स किंवा आयकिया, लेन्सकार्ट सारख्या कंपन्या वापरत असतात.

तुम्ही चष्मा ऑनलाइन विकत घेत असाल तर आपण नेहमी दुकानात जशा वेगवेगळ्या फ्रेम्स घालून आरशात बघतो तसं ऑनलाइन चष्मा खरेदी करताना ते ई-कॉमर्स अॕप तुम्हाला तो चष्मा कसा दिसेल हे तुमच्या फोटोला तो चष्मा घालून दाखवतं. त्याच पद्धतीने तुम्हाला एखादा टीशर्ट आवडला तर तो तुम्हाला कसा दिसेल हे तुमच्याच फोटोला तो टीशर्ट घालून दाखवतात.

या प्रकाराला ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणतात. यामध्ये हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स तुम्हाला दुकानात जाऊन खरेदी करण्याच्या नेहमीच्या अनुभवाजवळ नेण्याचा प्रयत्न करतात.

याचप्रमाणे चॕटबॉट्स वापरून दुकानातल्या विक्रेत्याला तुमच्यासमोर उभं करायचा प्रयत्न करतात. चॕटबॉट्स म्हणजे एक प्रश्नोत्तराचं अॕप आहे. यामध्ये नेहमी किंवा सर्वांत जास्त वेळा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे साठवून ठेवलेली असतात. याशिवाय हे चॕटबॉट्स इतके स्मार्ट असतात की ते तुम्हाला एखाद्या विक्रेत्या प्रमाणे प्रश्न विचारून तुम्हाला काय विकत घ्यायचं आहे याची माहिती विचारतात आणि तेवढ्याच वस्तू दाखवतात. पुढे जाऊन अगदी बारीक बारीक माहिती घेऊन चॕटबॉट्स तुमची खरेदी अजून सोपी करायचा प्रयत्न करतात.

बरेचसे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आजकाल व्हॉइस सर्चची सुविधा देतात. जेणेकरून ज्या लोकांना इंग्रजी, मराठी टायपिंग येत नाही किंवा वस्तू कशी शोधावी हे समजत नसेल तर ते ही सुविधा त्यांना उपयोगी पडते.

भारतात येत्या काही वर्षांत ई-कॉमर्सचा बिझनेस १८८ बिलियन डॉलर्स (मागच्या एका लेखात इतका होईल आणि या बिझनेस मधला मोठा वाटा आपल्याला मिळावा यासाठी अशा अनेक गोष्टी करतायत किंवा करायला लागतील.) पुढील लेखात आपण ई-कॉमर्स कंपन्या दुकानापेक्षा स्वस्तात वस्तू कशा विकू शकतात आणि त्यांचा मार्केट शेअर किती हे बघायचा प्रयत्न करूया.

Web Title: Samir Aathalye Writes Online Purchasing By App

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobonlineApp
go to top