Career Selection : असे निवडा करिअर...

आज शिक्षण घेणाऱ्या १० पैकी जवळपास सात लोकांची भविष्यात नोकरी जाणार हे निश्चित!
Career
CareerSakal

आज शिक्षण घेणाऱ्या १० पैकी जवळपास सात लोकांची भविष्यात नोकरी जाणार हे निश्चित! कारण आज शिकलेली बहुतेक कौशल्य पुढील १५ वर्षांत कालबाह्य होणार आहे. इंटरनेट युगाला आपण केव्हाच मागे टाकले असून, सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. त्यात आता ‘चॅट जीपीटी’सारख्या तंत्रज्ञानाची भर पडल्यामुळे मानवाला अनपेक्षित असलेले बदल येत्या काळात पाहायला मिळणार आहे. नव्याने होऊ घातलेल्या बदलांसाठी आजच्या विद्यार्थ्यांनी सज्ज व्हायला हवे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे करिअरची निवड...

तंत्रज्ञान जरी बदलले तरी नोकरीच्या संधी कमी झालेल्या नाही. जी व्यक्ती भविष्याचा आढावा घेत आजची कौशल्ये प्राप्त करेल, निश्चितच तिचे भविष्यही उज्वल असणार आहे. खरं तर चांगले करिअर कसे निवडायचे याचे उत्तर सोपे नाही. करिअर निवडताना तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, पण त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊ या.....

समाधान किंवा आनंद देणारे

नोकरीला लागल्यावर आपल्या दिवसातील तब्बल आठ तास आपण कामाच्या ठिकाणी देतो. त्यामुळे आपल्या जीवनाचा इतका महत्त्वाचा वेळ नक्कीच आनंदी जायला हवा. त्यामुळे जीवनात कोणतीही गोष्ट निवडताना सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हा निर्णय तुम्हाला आनंद देईल का ? त्याचप्रमाणे करिअरची निवड करताना हे लक्षात ठेवा की, तुम्हाला आनंद देणारे करिअर तुम्ही निवडता. उदाहरणार्थ, कला केल्याने तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही ते करिअर म्हणून निवडू शकता. कोणत्याही दबावाखाली कधीही करिअर निवडू नका.

स्वतःच्या क्षमता ओळखा

पाठांतर करून ब्रिलियंट झालेल्या लोकांची पुढील काळात कोणतीच गरज उरणार नाही. तुमच्यातील क्षमता आणि भविष्याची गरजच तुम्हाला नोकरी मिळवून देईल. करिअर निवडताना तुमची कार्यशैली कशी आहे ते पाहा. जर तुम्ही डेडलाईन पूर्ण करण्यात कुशल असाल तर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये तुमचे करिअर निवडू शकता परंतु तुम्हाला कोणतीही डेडलाईन किंवा कोणत्याही दबावाशिवाय काम करायचे असेल तर तुम्ही तुमचे करिअर म्हणून व्यवसाय निवडू शकता.

प्राधान्यक्रम निश्चित करा

आयुष्यभर एकच नोकरी ही संकल्पना आता कालबाह्य होत चालली आहे. त्यामुळे करिअरचा विचार केला तर सर्वप्रथम तुमचा प्राधान्यक्रम सांभाळा. लक्षात घ्या की तुम्हाला तुमचे उर्वरित आयुष्य एकच कार्य किंवा अनेक क्षेत्रे एक्सप्लोर करण्यात घालवायचे आहे. उदाहरणार्थ, पत्रकार होण्याला तुमचे प्राधान्य असेल, तर त्यासाठी पूर्ण प्रयत्न करा, पण तुम्हाला सरकारी नोकरीत करिअर करायचे असेल, तर त्यासाठीही तयारी ठेवा.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सध्या सर्वच गोष्टी प्रचंड वेगाने बदल आहे. नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थी जीवनातच अमुलाग्र बदल होणार आहे. अशा वेळी जर तुम्ही करियरच्या निवडीमध्ये खूप गोंधळलेले असाल, तर त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. हे तज्ज्ञ तुमचे पालक, तुमचे शिक्षक किंवा तुमची भावंडे देखील असू शकतात. त्यांना तुमच्याबद्दल माहिती आहे आणि ते तुम्हाला करिअरचा चांगला सल्ला देऊ शकतात.

सर्जनशील कौशल्यांना प्राधान्य द्या

भविष्यात सर्व कारकुनी कामे यंत्र करणार आहे. त्यामुळे असे कौशल्य आत्मसात करण्याच्या मागेच लागू नका. भविष्याचा आढावा घेत आणि आपल्या क्षमतांचा पुरेपुर विचार करत सर्जनशील कौशल्यांना प्राधान्य द्यायला हवे.

करिअर निवडीची चेक लिस्ट...

  • आपल्याला नक्की काय येते हे तपासा

  • थोडीशी भटकंती करत आपली आवड निश्चित करा

  • क्षमता ओळखून कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांची निवड करा

  • सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवा

  • घोकंपट्टी ऐवजी कौशल्यप्राप्तिवर भर द्या

  • आवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com