Foreign Scholarship : सारथीची परदेशी शिष्यवृत्ती प्रक्रिया लवकरच...

छाननी समितीची बैठक पडली पार; उमेदवारांनाही प्रतिक्षा
Foreign Scholarship
Foreign Scholarship esakal
Updated on

पुणे : राज्य शासनाने सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत शिष्यवृत्ती योजनेचा अध्यादेश १५ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला आहे. मात्र त्यासंबंधीची अर्ज प्रक्रिया अजूनही सुरू झाली नसल्यामुळे विद्यार्थी काहीसे चिंतित होते.

यासंबंधी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांना विचारले असता, त्यांनी यासंबंधीची आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली असून, शासनाच्या अंतिम परवानगीनंतर जाहिरात प्रसिद्ध होईल, असे सांगितले.

सारथीच्या वतीने विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. दरवर्षी परदेशातील विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर मध्ये सुरू होते. त्या आधीच अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांची छाननी होणे गरजेचे आहे.

अजूनही या संबंधीची कोणतीही हालचाल झाली नाही. स्टुडंट हेल्पींग हॅंडचे कुलदीप आंबेकर सांगतात, ‘‘सामाजिक न्याय(एससी) आणि बहुजन कल्याण विभागाची (ओबीसी) परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्व प्रक्रीया पूर्ण झाली.

त्यांची अंतिम यादी लवकरच घोषित होईल. मात्र अजूनही सारथीच्या वतीने कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया वेळेत पार न पडल्यास अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.’’ राज्य शासनाच्या वतीने २५ कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२४ साठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यात यावी, असा प्रस्ताव आम्ही राज्यशासनाला आधीच पाठविला होता. त्याला मंजुरी मिळून अध्यादेशही निघाला आहे. यासंबंधी छाननी समितीची बैठक झाली असून, शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर जाहिरात काढण्यात येईल.

- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sports Scholarship Returns in Pune; Athletes to Receive Financial Support Again
30 English Keywords
Pune
Big Relief for Aspirants: Maharashtra Expands Sarathi Scholarship for Overseas Studies
Foreign Disclosure Scheme India
Marathi News Esakal
www.esakal.com