Jobs Alert! ​NHAI मध्ये थेट मॅनेजर पदांवर भरती; मिळणार दोन लाखांपेक्षा अधिक पगार, जाणून घ्या ते कसे

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : NHAI Recruitment 2021 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India/NHAI) ने विविध विभागांमधील व्यवस्थापक पदासाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार 12 एप्रिल 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही एनएचएआयच्या अधिकृत संकेतस्थळालाही भेट देऊ शकता. तसेच, उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ही भरती केली जाणार असल्याचे प्रमुखांनी सांगितले.

रिक्त जागा

एनएचएआयने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे व्यवस्थापकांची एकूण 42 पदे भरली जातील. यामध्ये उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) ची 6, व्यवस्थापक (वित्त व लेखा) ची 24 पदे आणि उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांच्या 12 पदांचा समावेश आहे.

नोकरीत बढती मिळविण्यासाठी जाणून घ्या 7 प्रभावी टिप्स

वेतन आणि वय मर्यादा

डिप्युटी जनरल मॅनेजर वेतन -12 अंतर्गत डीए भत्ता 78800 ते 209200 रुपये पर्यंत (वयाची मर्यादा 56 वर्षे) मिळू शकेल.
व्यवस्थापक (वित्त व लेखा) - वेतन पातळी 11 अंतर्गत पगार व महागाई भत्ता (वय मर्यादा 56 वर्षे) 67700 रुपयांवरून 208700 रुपये मिळू शकेल.
उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) - वेतन पातळी 10, 56100 ते 177500 पर्यंत मिळू शकणार आहे. (वय मर्यादा 56 वर्षे)

आर्ट्समध्ये करिअर झालंय?; नोकरीच्या हमखास संधी, पगारही मिळणार लाखोंमध्ये!

कोण करू शकेल अर्ज?

डिप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स अँड अकांउंट्स) पदासाठी अर्ज करण्यासाठी बॅचलर ऑफ कॉमर्स / सीए किंवा एमबीए पदवी वित्त असणे आवश्यक आहे. व्यवस्थापक (वित्त व लेखा) पदासाठी वाणिज्य पदवी / सीए किंवा व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी व  वाणिज्य पदवी / सीए किंवा वित्त पासून एमबीए पदवी असणारे उमेदवार देखील उप व्यवस्थापक (वित्त व लेखा) पदासाठी अर्ज करू शकतात. 

अर्ज कसा करावा, हे जाणून घ्या

सर्व पात्रता आणि निकष पूर्ण करणारे उमेदवार केवळ ऑनलाइन अर्ज करू शकतात. एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटवर (nhai.gov.in) गेल्यानंतर आपल्याला फॉर्मची प्रिंट आउट घ्यावी लागेल आणि अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर तो अर्ज करावा लागेल. तसेच, या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी मागितली नसल्याचे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com