संधी करिअरच्या... : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (MIMH) ही पुणे येथे कार्यरत असलेली महाराष्ट्र शासनाच्या मानस आरोग्य या क्षेत्रातील राज्यस्तरीय संस्था आहे.
maharashtra institute of mental health pune
maharashtra institute of mental health punesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (MIMH) ही पुणे येथे कार्यरत असलेली महाराष्ट्र शासनाच्या मानस आरोग्य या क्षेत्रातील राज्यस्तरीय संस्था आहे.

- सविता भोळे

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (MIMH) ही पुणे येथे कार्यरत असलेली महाराष्ट्र शासनाच्या मानस आरोग्य या क्षेत्रातील राज्यस्तरीय संस्था आहे. प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रयत्नातून मानस आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशिक्षितांची संख्या वाढावी म्हणून १९९१मध्ये संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे संस्थापक डायरेक्टर म्हणून डॉ. आगाशे यांनीच काम बघितले. स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सर्वसमावेशक व समग्र मानस आरोग्यसेवा गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य संस्था करीत आहे.

मानसिक रुग्णांचे मनो सामाजिक पुनर्वसन व्हावे म्हणून संस्थेतर्फे डे केअर सेंटरही चालविले जाते. बी.जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सायकियाट्री डिपार्टमेंट व ससून जनरल हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही संस्था चालविली जात असून ससून हॉस्पिटलच्या प्रांगणात सुरू आहे. संस्थेतर्फे सायकियाट्री, सायकॉलॉजी, सायकियाट्रिक सोशल वर्क नर्सिंग या विविध क्षेत्रांशी संबंधित डिग्री, डिप्लोमा व शॉर्ट कोर्सेस राबविले जातात.

उपलब्ध कोर्सेस

1) एम.फिल, इन सायकल सोशल वर्क

कालावधी - २ वर्षे

पात्रता - MA/MSc in Psychology

प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा

2) एम.फिल. इन क्लिनिकल सायकॉलॉजी

कालावधी - २ वर्षे

पात्रता - MA/MSc in Psychology

प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा

3) एम.एस.सी.इन सायकियाट्रिक नर्सिंग (MSc)

कालावधी - २ वर्षे

पात्रता - BA/Bsc in Psychology or Nursing

प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा

4) सर्टिफिकेट कोर्स इन काउन्सिलिंग

कालावधी - १ वर्ष

पात्रता - MSW/MA in Psychology or social work

5) सर्टिफिकेट कोर्स इन पोस्ट ट्रीटमेंट केअर अँड सायको सोशल रिहॅबिलिटेशन

कालावधी - १ वर्ष

पात्रता - MA in Psychology or social work

6) पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग

कालावधी - १ वर्ष

पात्रता - BA/Bsc in Psychology or Nursing

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकेत स्थळ www.mimhpune.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com