संधी करिअरच्या... : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

film and television institute of india

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ही संस्था इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयांतर्गत कार्य करते व केंद्र सरकारच्या मदतीने चालविली जाते.

संधी करिअरच्या... : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

- सविता भोळे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ही संस्था इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयांतर्गत कार्य करते व केंद्र सरकारच्या मदतीने चालविली जाते.

ही संस्था १९६०मध्ये पूर्वीच्या प्रभात फिल्म कंपनीच्या प्रांगणात सुरू झाली. अनेक अभिनेते, दिग्दर्शक व फिल्म इंडस्ट्रीतले टेक्निशियन यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. त्यात प्रामुख्याने नसरुद्दीन शहा, शबाना आझमी, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, अदूर गोपालकृष्णन, राजकुमार राव, राजकुमार हिरानी, ओम पुरी यांचा समावेश आहे.

जगातील प्रमुख फिल्म आणि टेलिव्हिजन साठीच्या प्रशाळांच्या संस्थेची (CILECT) ही संस्था सदस्य आहे.

सुरुवातीला टेलिव्हिजन अँड ट्रेनिंग विभाग दिल्ली येथे कार्यरत होता. परंतु १९७४ मध्ये तो पुणे येथे आणण्यात आला. ‘एफटीआयआय’ला ‘सेंटर ऑफ एक्सिलेंस’ म्हणून मान्यता मिळावी म्हणून इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्री अंबिका सोनी यांनी पार्लमेंटमध्ये बिल आणले. यामुळे संस्थेला शैक्षणिक प्रतिष्ठा व विद्यापीठांमध्ये विशेषाधिकार मिळाले.

भारतातील नॉर्थ ईस्ट रिजन मधील तरुणांच्या क्षमतांना वाव मिळावा म्हणून संस्थेने अरुणाचल प्रदेशमध्ये नवीन सेंटर सुरू केले.

‘एफटीआयआय’तर्फे तीन वर्षांच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिरेक्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी आणि ऑडिओग्राफी या विषयांमध्ये तर दोन वर्षांचा कोर्स ॲक्टिंग व आर्ट डिरेक्शन या विषयांमध्ये चालवला जातो. यासोबतच दीड वर्षांचा कोर्स कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि ॲनिमेशनसाठी तर एक वर्षाचा कोर्स फिचर फिल्म स्क्रिप्ट रायटिंगसाठी चालविला जातो. तसेच एक वर्षाचा पोस्टग्रज्युएट सर्टिफिकेट कोर्स हा डिरेक्शन, इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग व ऑडीओग्राफी या विषयांसाठी चालविला जातो.

पी.जी. डिप्लोमा इन फिल्म विंग (P.G. Diploma)

कालावधी - ३ वर्षे

पात्रता - कोणतीही पदवी

प्रवेश परीक्षा - JET व मुलाखत

हा कोर्स

 • डिरेक्शन अँड स्क्रीन प्ले रायटिंग

 • सिनेमॅटोग्राफी

 • एडिटिंग

 • साउंड रेकॉर्डिंग अँड साउंड डिझाइन

 • डिरेक्शन अँड प्रॉडक्शन डिझाइन

 • स्क्रीन ॲक्टिंग (२ वर्षे)

 • स्क्रीन रायटिंग (२ वर्षे)

या विषयांसाठी उपलब्ध आहे.

वरील कोर्स मधील आर्ट डिरेक्शन अँड प्रॉडक्ट डिझाईन या कोर्ससाठी पात्रता ॲप्लाइड आर्ट्स, आर्किटेक्चर, पेंटिंग, इंटिरिअर डिझाईन किंवा फाइन् आर्ट्समधील संबंधित क्षेत्रातील पदवीही असून स्क्रीन ॲक्टिंग व स्क्रीन रायटिंग हे २ कोर्सेस २ वर्षे कालावधीचे आहेत.

पी.जी. सर्टिफिकेट इन टेलिव्हिजन विंग

कालावधी - १ वर्ष

पात्रता - कोणतीही पदवी

प्रवेश परीक्षा - JET व मुलाखत

हा कोर्स

 • डिरेक्शन

 • इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी

 • व्हिडिओ एडिटिंग

 • साऊंड रेकॉर्डिंग अँड टेलिव्हिजन इंजिनिअरिंग

या विषयांसाठी उपलब्ध आहे.

या सर्व कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील जॉइंट एंट्रन्स टेस्ट (JET) द्यायची असते. यातून निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते व मग अंतिम निवड होऊन प्रवेश मिळतो.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ: https://www.ftii.ac.in

Web Title: Savita Bhole Writes Career Opportunity Film And Television Institute Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CareerFilmsOpportunity