संधी करिअरच्या... : श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Career Opportunity

श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स वाणिज्य (कॉमर्स) आणि अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स)साठी प्रसिद्ध असून दिल्ली युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेले प्रमुख महाविद्यालय आहे.

संधी करिअरच्या... : श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स

- सविता भोळे

श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स वाणिज्य (कॉमर्स) आणि अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स)साठी प्रसिद्ध असून दिल्ली युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेले प्रमुख महाविद्यालय आहे. हे भारतातील प्रथम क्रमांकाचे असलेले कॉमर्स महाविद्यालय दिल्ली येथे १९२० मध्ये लाला श्रीराम यांनी सुरू केले. हे महाविद्यालय बी.कॉम (ऑनर्स) आणि बीए (अर्थशास्त्र) या दोन्हींसाठी विशेष लोकप्रिय आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना २०२१मध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीच्या गुणांचं कट ऑफ खालील प्रमाणे होता.

 • बीए (अर्थशास्त्र) - ९९.५० टक्के

 • बी. कॉम (ऑनर्स) - ९९ टक्के

पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी Common University Entrance Test (CUET) प्रवेश परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत मिळालेले गुण आणि प्रवेश परीक्षेचा स्कोअर, अंतिम प्रवेशासाठी ग्राह्य धरला जातो. पीजी डिप्लोमा कोर्ससाठी लेखी परीक्षा, गटचर्चा व मुलाखतीद्वारे निवड केली जाते. या वर्षी (२०२२मध्ये) पहिल्यांदा पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘CUET’ ला सामोरे जायचे आहे. या कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विविध प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाते आणि जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त होते.

उपलब्ध महत्त्वाचे कोर्सेस

१) PG Diploma

(ग्लोबल बिझनेस ऑपरेशन)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा- लेखी परीक्षा गटचर्चा व मुलाखत अशा तीन टप्प्यात.

२) बॅचलर ऑफ कॉमर्स

[B. Com(Hons)]

 • कालावधी - ३ वर्षे

 • पात्रता - १२ वी

 • प्रवेश परीक्षा : CUET

३) बॅचलर ऑफ आर्ट्स

[BA (Hons)Economics]

 • कालावधी - ३ वर्षे

 • पात्रता - १२ वी

 • प्रवेश परीक्षा - CUET

४) मास्टर ऑफ आर्ट्स

(M.A. Economics)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा - CUET

५) मास्टर ऑफ कॉमर्स

(M.Com)

 • कालावधी - २ वर्ष

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा - CUET

अधिक माहितीसाठी विद्यार्थी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.

संकेतस्थळ - www.srcc.edu

Web Title: Savita Bhole Writes Career Opportunity Shriram College Of Commerce Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top