करिअर घडविताना : इन्स्टिट्यूट ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इंडिया

इन्स्टिट्यूट ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इंडिया (IGMPI) ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशनच्या मान्यतेनुसार नोंदणीकृत ना नफा ना तोटा तत्त्वावर नोएडा येथे १९९३ ला सुरू करण्यात आली.
IGMPI
IGMPIsakal
Updated on
Summary

इन्स्टिट्यूट ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इंडिया (IGMPI) ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशनच्या मान्यतेनुसार नोंदणीकृत ना नफा ना तोटा तत्त्वावर नोएडा येथे १९९३ ला सुरू करण्यात आली.

- सविता भोळे

इन्स्टिट्यूट ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इंडिया (IGMPI) ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालया अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशनच्या मान्यतेनुसार नोंदणीकृत ना नफा ना तोटा तत्त्वावर नोएडा येथे १९९३ ला सुरू करण्यात आली. ही संस्था फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड ऑफ इंडियाची मान्यता प्राप्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि लाइफ सायन्स सेक्टर स्किल कौन्सिल आणि फूड इंडस्ट्री सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ NSDC शी संलग्न आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस संबंधित होऊ शकणाऱ्या सर्व चुकांचे निरसन करण्यासाठी ही संस्था सेवा पुरवते. फार्मा, फूड, कॉस्मेटिक्स, आयुर्वेद, बायोटेक आणि मेडिकल डिव्हायसेस संबंधित उद्योगांसाठी महत्त्वाचा घटक म्हणून कार्य करते. ‘आयजीएमपीआय’ येथे पदवी, पदव्युत्तर, वर्किंग प्रोफेशनलसाठी संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत.

उपलब्ध कोर्सेस

१. ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स

  • कालावधी - १ ते २ वर्ष

  • पात्रता - लाइफ सायन्सेसमधील पदवी.

  • प्रवेश - पदवीतील मार्गांवर मेरिट बेसिसवर प्रवेश मिळतो.

हा कोर्स फार्मा इंडस्ट्रीतील ४४ विषय, हेल्थकेअर इंडस्ट्रीतील १९ विषय व फूड इंडस्ट्रीतील २४ विषय अशा एकूण ८७ मध्ये उपलब्ध आहे. त्यातील काही महत्त्वाच्या स्पेशलिझेशन्स पुढीलप्रमाणे -

फार्मा इंडस्ट्री

  • गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस

  • हेल्थ सेफ्टी अँड एन्व्हॉर्मेन्ट

  • फार्मासिटिकल फॉर्मुलेशन अँड एंटरप्रुनरशिप

  • फार्मसिटीकल्स सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंट

  • पब्लिक हेल्थ अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट

हेल्थकेअर इंडस्ट्री

  • पब्लिक हेल्थ अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट

  • क्लिनिकल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट

  • क्वॉलिटी ऍश्युरन्स अँड क्वॉलिटी कंट्रोल

  • कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी

  • ड्रग डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट

फूड इंडस्ट्री

  • फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी

  • फूड सेफ्टी अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री

  • डेअरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी

  • फूड अँड ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट

  • ऑरगॅनिक फार्मिंग अँड फूड प्रॉडक्शन सिस्टीम

२. एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा कोर्स

  • कालावधी - ६ ते१२ महिने

  • पात्रता - लाइफ सायन्सेसमधली पदवी

  • प्रवेश - पदवीच्या गुणांवर मेरिट बेसिसवर प्रवेश मिळतो.

हा कोर्स फार्म इंडस्ट्रीतील ४२, हेल्थकेअर इंडस्ट्रीतील १८ व फूड इंडस्ट्रीतील २२ स्पेशलायझेशनमध्ये उपलब्ध आहे. यापैकी काही विषयांची नावे खालीलप्रमाणे

  • गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस

  • फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन अँड इंटरप्रुनरशिप

  • पब्लिक हेल्थ अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट

  • क्लिनिकल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट

  • रेग्युलेटरी अफेअर्स (मेडिकल डिव्हायसेस)

  • न्यूट्रिशन अँड डाएटिक्स

  • मेडिकल डिव्हाईस मॅनेजमेंट

  • हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट

  • क्लिनिकल रिसर्च

  • फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्व्हेशन

  • बेकरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी

  • हेल्थ सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट

  • फूड ॲनॅलिसिस अँड क्वॉलिटी ॲश्युरन्स

  • फूड क्वॉलिटी ॲश्युरन्स अँड क्वॉलिटी कंट्रोल

३. इंडस्ट्री सर्टिफिकेशन कोर्स

  • कालावधी - ३ ते ६ महिने

  • पात्रता - लाइफ सायन्सेसमधील पदवी

  • प्रवेश - पदवीच्या गुणांवर मेरिट बेसिसवर प्रवेश मिळतो.

हा कोर्स फार्म इंडस्ट्रीतील १६, हेल्थकेअर इंडस्ट्रीतील ४ व फूड इंडस्ट्रीतील ४ स्पेशलायझेशन अशा एकूण २४ विषयांमध्ये उपलब्ध आहे त्यापैकी काही विषय खालीलप्रमाणे

  • क्लिनिकल डॉक्युमेंटेशन इंप्रूव्हमेंट

  • फार्मास्युटिकल प्रॉडक्ट मॅनेजमेंट

  • हेल्थ सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम

  • मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह

  • क्लिनिकल न्यूट्रिशन

  • इंडस्ट्री सर्टिफिकेट इन HACCP

  • गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस

  • फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ - https:// www.igmpiindia.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com