संधी करिअरच्या... : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँड न्यूट्रिशन

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँड न्यूट्रिशन, न्यू दिल्ली ही संस्था IHM Pusa म्हणून ओळखली जाते.
Hotel Management
Hotel ManagementSakal
Summary

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँड न्यूट्रिशन, न्यू दिल्ली ही संस्था IHM Pusa म्हणून ओळखली जाते.

- सविता भोळे

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँड न्यूट्रिशन, न्यू दिल्ली ही संस्था IHM Pusa म्हणून ओळखली जाते. ही देशातील बेस्ट हॉटेल मॅनेजमेंट संस्था म्हणून नावाजलेली असून गेल्या १० वर्षांपासून सतत बेस्ट म्हणून तिला ऑल इंडिया रँक मिळत आहे. येथील फॅकल्टीज, शिस्त आणि इथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी यामुळे संस्थेचा बेस्ट हा रँक टिकून आहे. या संस्थेची स्थापना १९६२मध्ये करण्यात आली नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीशी संलग्न आहे.

‘आयएचएम पुसा’ येथे अंडर ग्रॅज्युएट,पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा,पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्सेस राबविले जातात. या सर्व कोर्सेससाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट कोर्सेससाठी NCHMCT JEE ही प्रवेश परीक्षा ग्राह्य धरली जाते तर बाकीच्या कोर्सेससाठी मेरीट बेसिसवर ॲडमिशन मिळते. येथील प्लेसमेंट सेल खूप स्ट्राँग असून १०० टक्के प्लेसमेंटचा दावा केला जातो. विविध कंपन्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉटेल्स ग्रुप या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी येत असतात.

‘आयएचएम पुसा’ येथे उपलब्ध असणारे प्रमुख कोर्सेस

बी.एस्सी. (B.SC.)

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - बारावी

  • प्रवेश परीक्षा - NCHMCT JEE

  • हा कोर्स हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात उपलब्ध आहे.

एम.एस्सी. (M.Sc.)

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - पदवी

  • प्रवेश परीक्षा - NCHM MSc JEE

  • हा कोर्स हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात उपलब्ध आहे.

डिप्लोमा (UG Diploma)

  • कालावधी - एक/दीड वर्ष

  • पात्रता - बारावी

  • प्रवेश परीक्षा - नाही

  • मेरीट बेसिसवर प्रवेश मिळतो.

हा कोर्स

१) बेकरी अँड कन्फेक्शनरी

२) फूड अँड बेवरेज सर्व्हिस या २ विषयात उपलब्ध आहे.

पीजी डिप्लोमा (P G Diploma)

  • कालावधी - १५/१८ महिने

  • पात्रता - पदवी

  • प्रवेश परीक्षा - नाही

  • मेरीट बेसिसवर प्रवेश मिळतो. हा कोर्स १) डायेटिक्स अँड हॉस्पिटल फूड सर्व्हिस २) अकोमोडेशन ऑपरेशन अँड मॅनेजमेंट या विषयात उपलब्ध आहे.

सर्टिफिकेट कोर्सेस (Certificate courses)

  • कालावधी - ६ आठवडे ते १८ महिने

  • पात्रता - दहावी

  • प्रवेश परीक्षा - नाही

  • मेरीट बेसिसवर प्रवेश मिळतो.

  • हा कोर्स १) फूड प्रॉडक्शन, २) बेकरी, ३) फूड अँड बेवरेज सर्व्हिस आणि ४) हाउसकीपिंग युटिलिटी या विषयात उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ - https://ihmpusa.net

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com