Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; अंमलबजावणीचे मोठे आव्हान

जलद निकालासाठी ‘ऑनस्‍क्रीन इव्‍हॅल्‍यूएशन’
Savitribai Phule Pune University challenge of implementation Onscreen Evaluation for quick results
Savitribai Phule Pune University challenge of implementation Onscreen Evaluation for quick resultssakal
Updated on

पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष तरी नियोजित वेळेत सुरू व्हावे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कंबर कसली असून, परीक्षांच्या जलद निकालासाठी ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्यूएशन’ करण्यात येणार आहे. मात्र, यासंबंधीची यंत्रणा निकोपपद्धतीने राबविण्याचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे.

सोमवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये कुलगुरु डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी यासंबंधीची माहिती दिली. विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पुर्णतः कोलमडले असून, संलग्न महाविद्यालयांतील उन्हाळी सत्र तब्बल अडीच ते तीन महिने उशीराने चालू झाले आहे. महाविद्यालये, विद्यापीठ प्रशासन, परीक्षा विभागाबरोबरच विद्यार्थी संघटनांतील समन्वयाच्या अभावामुळे कोरोनानंतरही दोन वर्षांनी शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलेलेच आहे.

यावर उपाय म्हणून यंदाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांमध्ये पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्यूशन’ पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्यात येतील. तसेच ही पद्धत यशस्वी ठरल्यास पुढील सत्रापासून सर्व अभ्यासक्रमांबरोबरच अधिक अद्ययावत प्रणाली राबविण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

काय आहे ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्यूएशन’?

तपासणीसाला थेट संगणकाच्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका उपलब्ध होणार आहे. परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका स्कॅनिंग करून एका सॉफ्टवेअरवर अपलोड करण्यात येतील. त्या तपासणी करणाऱ्या शिक्षकाबरोबरच पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही प्राप्त होतील. ही प्रक्रिया अतिशय जलद गतीने होत, गुणदान आणि गुणपत्रिका एका क्लिकवर उपलब्ध होईल. यासाठी लवकरच एका कंपनीची नेमनूक करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

ऑनस्क्रीनची आव्हाने...

- उत्तरपत्रिका अपलोड करण्यापासून ते तपासण्यापर्यंत संबंधितांना प्रशिक्षणाची गरज

- उत्तरपत्रिकांची गोपणीयता आणि निकोप तपासणीसाठी सुसज्ज यंत्रणा हवी

- अंमलबजावणीतील चूका दूरूस्त करण्यासाठी विद्यापीठाकडे पुरेसा वेळ नाही

तरीही शैक्षणिक वेळापत्रक पुर्ववत होईल?

दोन वर्षांच्या प्रयत्नानंतरही शैक्षणिक वेळापत्रक तीन महिने उशीराने चालू आहे. ऐनवेळी येणारे कार्यक्रम, विद्यार्थी संघटनांच्या मागण्या, प्राध्यापकांची आंदोलने आदींमुळे परीक्षांचे वेळापत्रक वेळोवेळी बदलावे लागते. महाविद्यालये आणि विद्यापीठ प्रशासनातील समन्वय, तसेच धोरणात्मक निर्णयाच्या अभावामुळे लांबत चाललेले सत्र केवळ ऑनस्क्रीन इव्हॅल्यूशनमुळे पुर्ववत होईल का? हा मोठा प्रश्न आहे.

विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी आम्ही सुक्ष्म नियोजन केले आहे. पुढील शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होईल, असा आमचा विश्वास आहे.

- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक सत्र पुर्ततेनंतरच उन्हाळी सत्राच्या परीक्षा घेण्यात येतील. परीक्षेनंतर सहा दिवसांच्या आतच उत्तरपत्रिका तपासल्या जाव्यात. आणि जलद निकाल लागावा म्हणून, पहिल्या टप्प्यात आम्ही पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनस्क्रीन इव्हॅल्यूएशन करत आहोत. यामुळे परीक्षा विभागावरील अतिरीक्त तान कमी होत, पदवीच्या निकाल प्रक्रियेला गती मिळेल.

- डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com