PHD : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडीसंबंधी सर्व माहिती एका क्लिकवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी. संबंधीची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी ‘पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग पोर्टल’चे अनावरण कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
savitribai phule pune university phd related information in just one click
savitribai phule pune university phd related information in just one click Sakal

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी. संबंधीची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी ‘पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग पोर्टल’चे अनावरण कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.

अनावरण कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. विजय खरे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे, सहायक कुलसचिव मोहन बेलेकर, श्रीपाद बुरकुले, माहिती तंत्रज्ञान कक्षाचे व्यवस्थापक नितीन पाटील, झुंजार भामरे, एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक हर्डीकर, अशोक काळे आदी उपस्थित होते.

पीएच.डी. प्रक्रियेतील लालफितीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचा संशोधनापेक्षा कागदपत्रांच्या पूर्ततेत जास्त वेळ जात होता. या पोर्टलमुळे पीएच.डी.चा अर्ज करण्यापासून ते ती घोषित होण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया या संकेतस्थळाद्वारे पूर्ण होणार आहे.

विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी या पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी या पोर्टलचा विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे.

पोर्टलवर मिळणार ही माहिती

- पीएचडी प्रवेशपूर्व परिक्षा,

- प्रवेश आणि अभ्यासक्रम

- पात्रता आणि शुल्क

- मार्गदर्शक आणि संशोधन केंद्र

याचे करता येणार ट्रॅकींग

तुमचा पीएचडीचा प्रवास म्हणजेच पूर्वपरिक्षा, प्रवेश, अपलोड केलेले कागदपत्र, तुमचे प्रबंध, शिष्यवृत्ती ही सर्व माहिती ट्रॅक करता येणार आहे. पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टल वापरण्यासाठी कुठलीही रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करण्याची गरज नाही. या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांचा पीएचडीचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

पोर्टलची लिंक : https://bcud.unipune.ac.in/Phd/Ph.D_Addmission/index.html

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com