SBI PO Recruitment : SBI मध्ये होणार तब्बल 2OOO पदांची भरती, असा करा अर्ज

परीक्षेसाठी लागणारी पात्रता, वय मर्यादा आणि निवड प्रक्रिया जाणून घेऊया सविस्तर.
SBI PO Recruitment
SBI PO Recruitmentesakal

SBI PO Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, SBI PO 2023 भरतीसाठीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी रेजिस्ट्रेशन प्रोसेस ७ सप्टेंबरला सुरू होणार असून अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२३ असणार आहे. यामध्ये एकूण २००० पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी एसबीआयच्या sbi.co.in या वेबसाइटवर व्हिजीट करून SBI PO 2023 चा अॅप्लिकेशन फॉर्म भरावा. परीक्षेसाठी लागणारी पात्रता, वय मर्यादा आणि निवड प्रक्रिया जाणून घेऊया सविस्तर.

SBI PO साठीची पात्रता

या पदासाठी सदस्य कुठल्याही क्षेत्रातून पदवीधर असावा. सदस्याचे वय २१ ते ३० वर्ष असावे. वय १ एप्रिल २०२३ च्या आत २१-३० पूर्ण झालेले असावे.

SBI PO Recruitment
SBI मध्ये 2056 PO पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी!

निवड प्रक्रिया

या परीक्षेसाठी सदस्यास फेज-२ आणि फेज-३ मध्ये वेगळे उत्तीर्ण व्हावे लागेल. या दोन्ही फेज ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असतील. या दोन्हींचे एकूण गुण फेज-३ मध्ये अॅड होतील. आणि सदस्यांची गुणवत्तेनुसार मेरीट लिस्ट जाहीर होईल. सोबतच सदस्यांना प्रीलिम्स, मेन्स आणि सायकोमेट्रिक टेस्ट आणि इंटरव्हू एवढ्या टप्प्यांतून जायचे आहे. (SBI)

SBI PO Recruitment
SBI : स्टेट बँकेला तिमाहीत विक्रमी निव्वळ नफा

SBI PO साठी अर्ज कसा करायचा

  • SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - sbi.co.in.

  • होमपेजवर करियर ऑप्शन लिंकवर जा

  • त्यानंतर PO/Clerk अप्लायवर क्लिक करा

  • त्यानंतर रजिस्टर करून अॅप्लिकेशन फॉर्म भरा

  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अटॅच करा आणि फी भरा

  • फॉर्म सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.

  • त्याची प्रिंटआउट जवळ ठेवा.

परीक्षेसाठीची फी General/EWS/OBC सदस्यांसाठी ७५० रुपये आहे. तर SC/St/PwBD सदस्यांसाठी फॉर्म निशुल्क आहे. (Job Alert)

एकूण २००० पदांपैकी, ८१० जागा या सामान्य वर्गासाठी असून, ५४० ओबीसी, ३०० एससी, दोनशे EWS आणि १५० एसटी वर्गासाठी राखीव आहेत. आणखी माहितीसाठी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन चेक करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com