शैक्षणिक कामगिरीच्या आधारे नाही तर प्रकल्पाच्या आधारे मिळेल ही शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abroad scholarship

शैक्षणिक कामगिरीच्या आधारे नाही तर प्रकल्पाच्या आधारे मिळेल ही शिष्यवृत्ती

मुंबई : विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी (NTU), यूके यांच्या संयुक्त विद्यमाने युनिव्हर्सिटी लिव्हिंगने भारतीय नागरिकत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. ज्यांना चांगल्या समाजात, पर्यावरणात योगदान देण्याची इच्छा आहे किंवा त्यांनी योगदान दिले आहे, अशांसाठी ही शिष्यवृत्ती आहे.

ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित नसून उमेदवाराला त्यांच्या प्रकल्पाच्या सामाजिक आधारावर न्याय दिला जाईल. गेल्या काही वर्षांत त्यांच्या या प्रकल्पाचा समाजावर काय परिणाम झाला हे पाहिले जाईल.

सामाजिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा

१. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम युनिव्हर्सिटी लिव्हिंगच्या अधिकृत वेबसाइट universityliving.com ला भेट द्या.

२. त्यानंतर वेबसाइटच्या होमपेजवरील 'स्कॉलरशिप' टॅबवर क्लिक करा.

३. अर्ज करण्यासाठी दिलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरण्यासाठी खाली स्क्रोल करा.

४. त्यानंतर तुमचा सामाजिक प्रभाव दाखवणारा व्हिडिओ रेकॉर्ड करा.

५. तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट म्हणून अपलोड करा आणि 'नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी' आणि 'युनिव्हर्सिटी लिव्हिंग' टॅग करा.

'सामाजिक शिष्यवृत्ती' फक्त भारतीय नागरिक असलेल्या आणि नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी, यूके येथे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. हे सप्टेंबर २०२२/फॉल इनटेकसाठी लागू आहे. NTU सह पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा करत असलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे खुले आहे. तथापि, उमेदवाराकडे NTU सह पूर्णवेळ अभ्यासक्रम ऑफर लेटर असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येच्या अटी व शर्तींनुसार शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

Web Title: Scholarships Are Awarded On A Project Basis Not On Academic Performance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top