

School Education Department Approves Teacher Recruitment Till May 6, 2026
sakal
School Education Department Approves Teacher Recruitment: शालेय शिक्षण विभागाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर म्हणजेच मे २०२६ पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी (टेट-२०२५) मधील गुणांच्या आधारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला, आहे.