School Fees : शाळांचे शुल्क भिडले गगनाला; कर्ज काढून ‘ईएमआय’ भरण्याची वेळ

घर, चारचाकी असो वा एक वेळ उच्च शिक्षण असो त्यासाठी एखाद्याने कर्ज घेतले तर आपल्याला त्यात काही नवल वाटणार नाही.
school fees
school feessakal
Updated on

पुणे - घर, चारचाकी असो वा एक वेळ उच्च शिक्षण असो त्यासाठी एखाद्याने कर्ज घेतले तर आपल्याला त्यात काही नवल वाटणार नाही, हो ना! अहो, पण आता चक्क शाळेचे शुल्क भरण्यासाठी पालकांवर कर्ज काढून ‘ईएमआय’ भरण्याची वेळ आली आहे. खासगी शाळांच्या शुल्काने गगनभरारी घेतल्याने पालकांना आता शुल्काचे आर्थिक गणित जुळवून आणण्यासाठी ओढाताण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

कोरेगाव पार्कमधील रहिवासी असणारे अजय चव्हाण (नाव बदललेले आहे) म्हणतात, ‘रावीला (त्यांची पाच वर्षांची मुलगी) सुविधांनी सुसज्ज आणि तिच्यातील कल्पकतेला चालना मिळेल, अशी शाळा निवडून प्रवेश घेतला. शाळेचे शुल्क तीन लाख रुपयांहून अधिक आहे. अर्थात, थोडीफार आगाऊ रक्कम भरली असून, उर्वरित शुल्क भरण्यासाठी बॅंकेचे कर्ज काढले आहे.’

अजय यांच्याप्रमाणेच असंख्य पालक सध्या पाल्याच्या शाळा प्रवेशाच्या गडबडीत आहेत. अर्थात, जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेशाची प्रक्रिया नोव्हेंबर - डिसेंबरपासूनच सुरू होते. त्यातील मार्च - एप्रिल हा प्रवेशाचा तसा पाहिला तर अंतिम टप्पा असतो. त्यामुळे, शाळेचे पहिल्या टप्प्यातील शुल्क भरण्यासाठी पालकांची धावपळ आणि जुळवाजुळव सध्या सुरू असल्याचे दिसून येते.

एकीकडे पालकांकडून शाळांच्या शुल्काबाबत आरडाओरडा केला जात आहे. तर, दुसरीकडे पालकांकडूनच सुसज्ज शाळा आणि अत्याधुनिक सुविधांची मागणी शाळांकडे होत असल्याचे खासगी संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

अवाजवी शुल्काचा यांना फटका

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालक

‘आरटीई’नुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशाची संधी न मिळालेले

एकल महिला पालक

सुरुवातीला शैक्षणिक शुल्क भरल्यानंतरही शाळांकडून घेण्यात येणाऱ्या अन्य शुल्कामुळे त्रासलेले पालक

उच्च पायाभूत सुविधा, वातानुकूलित वर्गखोल्या, सुसज्ज मैदाने अशा मागण्या पालकांकडून होत आहेत. याशिवाय संबंधित शिक्षण मंडळाच्या नियमांची पुर्तता शाळांना करावी लागते. ‘सीबीएसई’ शाळांमध्ये एका मुलामागे पाच पुस्तके आणि विषयनिहाय प्रयोगशाळा आवश्यक आहेत. ‘आयबी’ शाळांमध्ये दर २५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि कल्पक उपक्रम आवश्यक आहेत. शिक्षण मंडळाच्या नियमांची आणि पालकांच्या मागणीची पुर्तता करण्याचा दबाव शाळाचालकांवर आहे.

- जागृती धर्माधिकारी, राज्य अध्यक्ष, इन्डिपेंडंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन

दर्जेदार शिक्षणाबाबत पालक कधीही तडजोड करत नाहीत. परंतु, खासगी शाळा दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली केवळ ‘ब्रॅडिंग’ करतात. दर्जेदार सुविधा आणि शिक्षण देताना शाळांनी शुल्क आकारायला हरकत नाही. परंतु ते पालकांना परवडणारे आणि विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com