शिक्षण आनंददायी करणारी शाळा (मुकेश तिलवानी)

मुकेश तिलवानी
Wednesday, 18 December 2019

पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव व प्रयोगातून विद्यार्थी शिकत असतो. त्यामुळे आजकालच्या प्रॅक्‍टिकल जगात तग धरून राहण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून वात्सववादी शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- मुकेश तिलवानी, संचालक, ॲकॅडमिक हाइट्‌स पब्लिक स्कूल. सचिव, के. व्ही. तिलवानी एज्युकेशनल फाउंडेशन.

शाळेतील शिक्षण हे अधिक उपयोगी होण्यासाठी विविध कार्यशाळा व उपक्रमांच्या माध्यमातून ॲकॅडमिक हाइट्‌स पब्लिक स्कूल मुलांसाठी अभ्यासक्रमांची आखणी करते. सर्कल टाइम, ‘नो बॅग डे, हस्तकला क्‍लब, कन्सेप्ट रूम यांसारखे उपक्रम शाळेमार्फत राबविले जातात. ज्यामुळे मुलांना शिक्षण खऱ्या अर्थाने आनंददायी होते व चांगला विद्यार्थी घडण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण ही २१ व्या शतकातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. केवळ वैयक्तिक नव्हे, तर प्रगतिपथावरील समाज, राष्ट्र आणि जगासाठीही हे शिक्षण विशिष्ट पद्धतीने आत्मसात करायला हवे. नेमका हाच दृष्टिकोन विचारात घेऊन ॲकॅडमिक हाइट्‌स पब्लिक स्कूल अशा पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे. या शाळेत प्रत्येक विद्यार्थी उत्तमोत्तम असावा, यासाठी सृजनात्मक शिक्षणाबरोबर नवनिर्मितीचे शिक्षण दिले जाते. शिक्षण नीरस नसावं, त्याचं ओझं वाटू नये, मुलांना आवडावं, गंमत यावी, भविष्यात उपयोगी पडावं, परीक्षेपुरतं केलं आणि विसरलं असं नसावं. प्रत्येक विषय मुलांच्या जीवनाशी आणि समाजाशी जोडलेला हवा. अशाप्रकारचं शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. ॲकॅडमिक स्कूल बदलत्या काळानुसार मुलांना केवळ परीक्षार्थी शिक्षण न देता त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्यावहारिक जीवनात कसा होईल, याकडेही लक्ष देते. सगळं शिक्षण प्रत्यक्ष प्रयोगातून झालं की ते विसरलं जात नाही, म्हणूनच अनुभव व प्रयोगात्मक शिक्षणाची योग्य सांगड घालून विविध कार्यशाळा व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम बनविले जाते. 

शालेय अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये 
सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा

अनुभव व प्रयोगावर आधारित शिक्षण 

विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्यांचा आणि वक्तृत्वगुणांचा विकास होण्यासाठी उपक्रम

गणित व विज्ञान क्‍लब - गणित आणि विज्ञानाच्या क्‍लबमुळे किचकट वाटणारा विषय खेळांच्या माध्यमातून मांडला गेल्याने तो- सोपा होतो. विद्यार्थ्यांमधील किचकट आणि तार्किक विचार करण्याच्या क्षमतेचा विकास होतो. 

हस्तकला क्‍लब, शास्त्रीय नृत्य, वाद्यसंगीत, वारसा क्‍लब, वाचन क्‍लब, आपत्ती व्यवस्थापन क्‍लब, पर्यावरण क्‍लब, आरोग्य क्‍लब, हस्ताक्षर क्‍लब यांसारख्या क्‍लबमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशील विचारासह जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होते.

नो बॅग डे - शनिवार हा ‘नो बॅग डे’ असतो. बॅगचे ओझे नसल्याने हा दिवस मुलांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे मनमोकळा संवाद व मुलांना व्यक्त होण्याचा हा दिवस असतो.  

सर्कल टाइम - या वेळात मुलांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून नैतिक मूल्य, जबाबदारी, सामाजिक भान यांची जाणीव करून दिली जाते.

कन्सेप्ट रूम - या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे स्वत:चे जग शोधण्याची संधी मिळते. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील त्यांच्या आवडीनिवडी, संघर्ष याचे निरीक्षण करण्याची आणि त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्याची संधी मिळते.

Culit - विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अभ्यास व अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवर कार्यशाळा घेण्यात येतात. 

शून्य तास (झीरो पिरीयड) - आपले कलागुण सादर करण्यासाठी हा वेळ असतो. त्याद्वारे विविध विषयांवरील प्रयोग, कला, नाटक यांमार्फत व्यक्त होण्याची संधी दिली जाते. पालकांचे शाळेशी भावबंध निर्माण व्हावेत म्हणून मातीकाम, पालकांसाठी चर्चासत्र, मुलांशी मोठ्याने बोला आणि वाचा यासारखे उपक्रम राबविण्यात येतात. 
विद्यार्थ्यांसाठी वार्षिक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे त्यांच्यातील नावीन्यपूर्ण कल्पना वास्तवात आणण्याची संधी मिळते.

मुलांसाठी नियमितपणे मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

स्वयंशिक्षण, स्वयंमूल्यमापन, स्वयंजागरूकता यांसारख्या साधनांमुळे मुलांमधील कौशल्यांचा विकास होतो.

विद्यार्थ्यांमधील खिलाडूवृत्ती वाढीस लागावी म्हणून वार्षिक खेळ दिनाचे आयोजन केले जाते.

शाळाबाह्य उपक्रम
ॲनिमेशन
अत्याधुनिक खेळ
नृत्य प्रशिक्षण
माहिती आणि संगणक तंत्रज्ञान
भाषा आणि वाचन क्‍लब
योगा
कलाकुसर क्‍लब
पर्यावरण क्‍लब
वाचन क्‍लब
वारसा क्‍लब
शास्त्रीय नृत्य
स्केटिंग
आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन

सुविधा
डे- केअर सुविधा 
डिजिटल क्‍लासरूम
सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा
ग्रंथालय
सीसीटीव्ही
जीपीएस ट्रॅकिंग
शालेय उपक्रमांच्या 
माहितीसाठी मोबाईल ॲप 
आरोग्य तपासणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A school that makes learning fun Mukesh Tilwani