
Screen Time Debate
Sakal
मृदुला अडावदकर - सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
आजकाल जिकडे तिकडे बघावं तिकडे मुलांच्या स्क्रीन टाइमबद्दल सगळेजण टीका करत असतात. मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय, त्यामुळे त्यांच्या वागण्यावर, बोलण्यावर विचार करण्याच्या प्रक्रियेवर सगळ्यांवरच परिणाम झाला आहे. परंतु फक्त स्क्रीन टाइमचा परिणाम नाही, तर स्क्रीनवर तुम्ही काय बघता हे तितकंच महत्त्वाचं आहे. एखादं मूल तासभर रीलच बघत असेल, गेमच खेळत असेल तर त्याचा मेंदूवर नक्कीच वाईट परिणाम होऊ शकतो, परंतु एखादं मूल तंत्रज्ञान वापरून कोडिंग करायला शिकत असेल किंवा एखादा ॲप तयार करत असेल, एखादा गेम तयार करायला शिकत असेल, तर हे मात्र थोडसं वेगळं आहे.