Police Recruitment : पोलिस भरतीसाठी SEBC चे दाखले मिळण्याचा मार्ग 'खुला'; शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला पर्याय

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले.
Police Recruitment
Police Recruitmentesakal
Summary

एसईबीसी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी या भरतीत आरक्षण देण्यात आले असूनही दाखले मिळत नसल्याने त्यांना अर्जच करता येत नव्हता.

कऱ्हाड : मराठा समाजातील (Maratha Community) तरुण-तरुणींना सरकारच्या दप्तरदिरंगाईमुळे एसईबीसीचे दाखले मिळत नव्हते. त्यातच पोलिस भरतीसाठी (Police Recruitment) अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च होती. त्यामुळे दाखल्याअभावी अनेक तरुण- तरुणी या भरतीला मुकणार होते. त्यासंदर्भात ‘सकाळ’ने आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन शासनाने भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

त्याचबरोबर दाखले देण्यासाठीची कार्यवाहीही आजपासून सुरू केली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. मराठा समाजाची मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतले. त्यात मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचा लाभ शिक्षण (Education) व नोकरीत होईल, असेही जाहीर करण्यात आले. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीत एसईबीसीतील तरुणांना अर्ज करता येणार आहेत.

Police Recruitment
Kolhapur Lok Sabha : आक्षेपार्ह पोस्टद्वारे शाहू महाराजांची बदनामी; सतेज पाटलांची पोलिसांकडे तक्रार, असं काय आहे SMS मध्ये?

शासनाने आरक्षण २६ फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २५ मार्चपर्यंत तरी दाखले मिळालेले नव्हते. मराठा समाजातील अनेक तरुण- तरुणींनी एसईबीसी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. मात्र, शासनाच्या जात प्रमाणपत्र वितरित होणाऱ्या संकेतस्थळावर २०१४ मधील आरक्षणाचाच संदर्भ दिसत होता. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदारांनी त्यासंदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांच्‍याकडून मागवले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते. दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च होती.

मात्र, एसईबीसी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी या भरतीत आरक्षण देण्यात आले असूनही दाखले मिळत नसल्याने त्यांना अर्जच करता येत नव्हता. परिणामी, राज्‍य शासनाने ही भरतीच पुढे ढकलावी, अशी मागणी तरुणांनी केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’नेही आवाज उठवला होता. त्याची दखल शासनाने घेऊन शासनाने आता पोलिस भरतीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर एसईबीसाचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने दाखले मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

Police Recruitment
Kirit Somaiya : 'काळ्या पैशाचा वापर झाल्याने ED कडून अनिल परबांची चौकशी; ती केस न्यायप्रविष्ट, आता माझा रोल संपलाय'

एसईबीसीचे प्रमाणपत्र शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून मिळण्यास प्रारंभ झाला आहे. त्यासाठीची आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून दाखले घेण्यासाठीची कार्यवाही करावी. दाखले लवकरात लवकर देण्यासाठीची कार्यवाही सुरू करत आहोत.

-विजय पवार, तहसीलदार, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com