पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीत राज्यातील एकूण दोन लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली (ॲलॉट) आहेत. या फेरीत पुणे विभागातील जवळपास ४३ हजार ७०२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. दुसऱ्या फेरीचा कट-ऑफ देखील जाहीर करण्यात आला आहे.