

The Power of Self-Reliance in Career Building
sakal
डॉ. सचिन जैन (संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड)
कौशल्य विकसन
‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!’ असं म्हटलं जातं. ध्येय जर आपलं आहे, तर त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नदेखील आपण स्वतःच केले पाहिजे. महाभारताच्या युद्धात कृष्ण जरी साथीला असला, तरी धनुष्यबाण अर्जुनालाच चालवावे लागले. कारण, युद्ध कौरव-पांडवाचे होते, कृष्ण फक्त पाठीशी होता. त्या वेळी अर्जुना चलबिचल झाल्यावर ‘भगवद्गीता’ त्याला कृष्णाने सांगितली. मात्र, त्यानंतरही अस्त्र-शस्त्र अर्जुनच चालवत होता.