Set Exam : सेटचे ऑनलाइन अर्ज सुरू होणार आठवडाभरात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेसाठी (सेट) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
Online form set exam
Online form set examesakal

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रता परीक्षेसाठी (सेट) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी पुढील दोन दिवसातच सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

सेट विभागातर्फे ३९ वी सेट परीक्षा येत्या ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा ठरणार असून, त्यासाठी उमेदवारांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया येत्या १२ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीपर्यंत नियमीत शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यास वेळा दिला जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. परीक्षेचे हॉल तिकीट व इतर माहिती सेट विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सेट परीक्षा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा लवकरच संपेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. नेट परीक्षेप्रमाणेच सेट परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.परंतु, विद्यापीठातर्फे एप्रिल महिन्यात होणारी सेट परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

मात्र, यापुढील ४० वी सेट परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तसेच या परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर आनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com