Set your goalssakal
एज्युकेशन जॉब्स
उद्दिष्ट मोठे ठेवा!
तुम्ही स्वतःला भविष्यात कसे बघता? काय केल्यानंतर तुम्हाला आयुष्यात यशस्वी झालो असे वाटेल? आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आपण कायकाय केले असता आयुष्य सार्थक झाले असे वाटेल? असा विचार करून बघा.
गेल्या काही भागांत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांत काय प्रकारचे ज्ञान, कौशल्य, वृत्ती लागते असे पाहिल्यानंतर आता आपण शेवटच्या काही भागांकडे वळूया. सर्वच कार्यक्षेत्रांविषयीची माहिती आपण घेऊ शकलो नाही याची कल्पना आहे, परंतु याकडे नमुन्यादाखल बघूया. सर्वच कार्यक्षेत्रांची माहिती देणे शक्यही नाही आणि तशी इथे अपेक्षितही नाही. ती माहिती तुम्ही संकेतस्थळांवरूनही मिळवू शकाल. या मालिकेचे उद्दिष्ट कार्यक्षेत्रासंबंधी स्वतःचा शोध घ्यायला मदत करणे हा होता. त्या दिशेने थोडे पुढे जाऊया.