वाचाल तर वाचाल वाचवाल सुद्धा!

शैलेश बर्गे
Thursday, 30 January 2020

वाचनाचे महत्त्व पटल्यावर तुम्ही स्वतःच नियमितपणे वाचन सुरू कराल. 

ऐकण्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी का ऐकावे, हे आपण पाहिले. तसेच काय व कसे ऐकावे हेही पाहिले. संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठीचे पुढचे कौशल्य आपण पाहू या. आपण सुरुवातीच्या लेखात समजून घेतलेले आहेच की LSRW या कौशल्याने भाषा शिकणे सुलभ ठरते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या महत्त्वाच्या कौशल्यांपैकी LISTENING AND READING ही कौशल्ये INPUT SKILLS, CONSUMING SKILLS, RECEPTIVE SKILLS, LEARNING SKILLS या नावानेही ओळखली जातात. कारण यामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते, आपण नवनवीन माहिती मिळवीत असतो, नवनवीन गोष्टी शिकत असतो. वाचनाचे महत्त्व हे शीर्षकामुळे अधोरेखित झालेले आहेच. या आधी आपण वाचाल तर वाचाल ही उक्ती ऐकली असेल, पण त्यापुढे जाऊन वाचाल तर इतरांना वाचवाल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतातच, त्याचबरोबर आपण ज्या भाषेतील ग्रंथ, पुस्तके वाचत आहोत त्या भाषेतील आपली शब्दसंपत्ती वाढवत असतो. इंग्लिश भाषेत फार मोठ्या प्रमाणात वाचन साहित्य आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. मराठी भाषेप्रमाणेच या भाषेतील साहित्यातही विविधता आहे. 

वाचनाचे महत्त्व पटल्यावर तुम्ही स्वतःच नियमितपणे वाचन सुरू कराल. 

इंग्लिशमधील पुस्तकांच्या वाचनाचे फायदे
Reading redirects ः
वाचनाने नवीन माहिती मिळण्यास मदत होते. त्याचा स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयोग होत असतो. चुकीच्या सवयींना, आचार-विचारांना योग्य ती दिशा मिळते. 

A powerful pastime ः वाचन ही एक वेळ सत्कर्मी लावण्यासाठीची उत्तम सवय आहे आणि यासाठी आपल्याला सहजपणे वेळ काढता येतो. त्याला कसलीही पूर्व तयारी लागत नाही. वेळ जात नसेल (travelling, waiting, etc) तर वाचन ही अगदी सुयोग्य गोष्ट आहे. 

Readers visit places without actually going there ः वाचनाने आपण एखाद्या ठिकाणी न जाता तिथली इत्थंभूत माहिती मिळवू शकतो. तसेच एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी काय काय पाहावे, या बद्दलचे वाचन करून मग प्रत्यक्षात तिथे जाऊन योग्य ती निरीक्षणे करू शकतो. उदा. एखाद्या किल्ल्यावर जाण्यापूर्वी त्या किल्ल्यावर कोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे महत्त्वाचे आहे, हे आपण आधीच वाचनातून माहिती करून घेऊ शकतो.

Reading refreshes ः वाचनामुळे थकवा दूर होऊन आपण मानसिकदृष्ट्या ताजेतवाने होतो. The man is known by the company he keeps. And it is better to be alone than in a bad company. Books never let you feel lonely. They are you are unfailing companions. पुस्तकासारखा मित्र नाही. कारण मित्राप्रमाणे पुस्तके आपल्याला योग्य मार्ग दाखवितात. 

Readers become leaders. उत्तम वाचनाने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकता. कारण वाचनाने तुमच्या क्षेत्रातील तुमचे ज्ञान तुम्ही अद्ययावत ठेवत असता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shailesh barge article reading