
Solapur News: इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून करिअरच्या अनेक संधी आहेत. आर्थिक व गणितात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कला क्षेत्रानंतरही शेअर बाजार, बिझनेस ॲण्ड फायनान्ससह अन्य आर्थिक क्षेत्रात संधीची दारे उघडी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमाची अचूक निवड केल्यानंतर निश्चितपणे विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध होईल.