मुलांनो 2020 आलंय; करिअर घडविण्यासाठी हे कराच!

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 2 January 2020

शिक्षण घेत असताना नेमके काय करायला हवे?
यशस्वी करिअर घडविण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये कोणती? 
पदवीनंतर करिअरच्या कुठल्या संधी आहेत

महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या व नोकरी करणाऱ्या युवाशक्तीला नमस्कार! भारत २०२२ पर्यंत जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. देशातील १३० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ५५ कोटी युवा असल्याने भारत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाची लोकसंख्या समस्या मानली जात असली, तरी सकारात्मक विचार केल्यास व तरुणांमधील कौशल्यांचा विकास केल्यास तीच एक मोठी ताकद बनेल. कदाचित भारत हा जगातील सर्वांत जास्त मनुष्यबळाची निर्यात करणारा देश बनू शकतो. मात्र, त्यासाठी विविध उपाययोजना करून तरुणांमध्ये कौशल्य विकसित करावी लागतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील व राज्यातील तरुणाईमध्ये मोठी ऊर्जा सामावली आहे. काहीतरी चांगले करून दाखविण्याची प्रचंड ऊर्मी आणि इच्छाशक्ती असलेल्या या युवाशक्तीला योग्य दिशा मिळाल्यास भारताला महासत्ता होईल. दिवंगत राष्ट्रपती व प्रसिद्ध शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांना अपेक्षित ‘इंडिया सुपर पॉवर बाय २०२०’ हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता युवा पिढीत आहे. त्यांचे स्वप्न हे स्वप्न येत्या काळात नक्कीच पूर्ण होईल, अशी आशा बाळगूया.

सशक्त व जगज्जेता भारत घडविण्यासाठी व त्याचबरोबर स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा व आपल्या समाजाचा विकास घडविण्यासाठी या तरुणाईच्या मनातदेखील काही प्रश्‍न असतात. 

(लेखक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल प्लेसमेंट सेल्सचे अधिष्ठाता आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheetalkumar ravandale article about Career