भविष्य नोकऱ्यांचे :अशी आहे यंदाची अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 

भविष्य नोकऱ्यांचे :अशी आहे यंदाची अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेली राज्यातील अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. विद्यार्थी व पालक यांनी ही प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यायला हवी. अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेसाठी खालील वेबसाइट्स महत्त्वाच्या आहेत. 

१) अर्ज भरण्यासाठी 
http://CETcell.mahaCET.org 

२) मागील वर्षाचे CUT-offs व इतर माहितीसाठी : 
www.DTEmaharashtra.gov.in 

३) कुठल्याही महाविद्यालयांची फी बघण्यासाठी : 
www.sssamiti.org 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशी असेल प्रवेश प्रक्रिया 
- गेल्या वर्षीपर्यंत प्रवेशप्रक्रियेसाठी ३ किंवा ४ फेऱ्या होत असत, या वर्षी मात्र फक्त २ फेऱ्या होणार आहेत. 
- अर्ज भरल्यानंतर कागदपत्र पडताळणी यंदा ऑनलाइनच होणार असून, अंतिम गुणवत्ता यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. 
- त्यानंतर पहिली फेरी होईल. विद्यार्थी सुमारे ३०० पर्याय भरू शकतात. 
- पहिला पर्याय मिळाल्यास मात्र प्रवेश घेणे अनिवार्य असते. विद्यार्थ्यांनी वा पालकांनी आपला पासवर्ड कुणालाही सांगू नये. 
- पहिल्या फेरीची यादी २८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. 
- पहिल्या फेरीत मिळालेले महाविद्यालय व शाखा विद्यार्थ्याला आवडत असेल तर FREEZE चा पर्याय निवडावा लागेल. 
- महाविद्यालय नको असल्यास NOT FREEZE चा पर्याय निवडून दुसऱ्या फेरीसाठी जाता येईल. 
- दुसऱ्या फेरीची यादी ६ जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. ९ जानेवारी पर्यंत विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्जासाठीची कागदपत्रे: 
- कॉलेज / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 
- १० व १२वीचे मार्कशीट 
- MHT CET Score Card किंवा JEE Main Score Card 
- डोमिसाईल/नॅशनॅलिटी सर्टिफिकेट 
- जात/ जमात प्रमाणपत्र 
- जात/जमात वैधता प्रमाणपत्र (Caste/ Tribe Validity Certificate) 
- नॉनक्रिमी लेअर प्रमाणपत्र (३१ मार्च २०२१पर्यंत वैध) 
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र, TFWS साठी ८ लाख पर्यंत 
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र 
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र (EWS Certificate) 
(सर्व ओरीजिनल कागदपत्रे स्कॅन करावीत. Jpg किंवा Gif प्रकारची फाईल असावी व साईज १ MB पेक्षा कमी असावी.) 

पात्रता : 
बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र व गणित विषयांसह उत्तीर्ण व खुल्या वर्गासाठी ४५% आणि मागासवर्गीयांसाठी ४०% गुण असावेत. भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्र मिळून १३५ गुण होत नसल्यास रसायनशास्त्र ऐवजी Biotechnology, Biology किंवा Technical व्होकेशनल कॉम्प्युटर वा आयटी इ. विषयाचे एकूण गुण १३५ असावेत. CET परीक्षेमध्ये शून्यापेक्षा जास्त गुण असावेत. 

विविध वर्गांसाठीचे आरक्षण पुढील प्रमाणे असेल : 
- शासकीय महाविद्यालयात १००% जागा CET मार्फत महाराष्ट्राच्याच विद्यार्थ्यांसाठी असतात. इतर खासगी महाविद्यालयात ८०% जागा कॅप राऊंड मधून (CET - ६५ % व JEE - १५%) 
भरल्या जातात, तर उर्वरित २०% जागा महाविद्यालयातर्फे मॅनेजमेंट कोट्यामधून भरल्या जातात. 
- राज्य पातळीवरील जागांपैकी ७०% जागा होम युनिव्हर्सिटीसाठी व ३०% जागा महाराष्ट्रातील इतर युनिव्हर्सिटीसाठी असतात. 
उदा. पुणे विद्यापीठाअंतर्गत एखाद्या महाविद्यालयात ७०% होम युनिव्हर्सिटीतील जागांसाठी पुणे, नाशिक व नगर या जिल्ह्यांतून १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल व महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फक्त ३०% जागांवर प्रवेश मिळेल. 
- एकूण जागांच्या ३० % जागा मुलींसाठी आरक्षित असतात. 

अर्ज भरण्यासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये व इतर आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क असेल 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com