

Integrated education turns learning into a meaningful experience through all five senses.
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
एकात्मिक शिक्षण म्हणजे केवळ विषयांविषयांमधील एकात्मिकता नव्हे. तर अध्ययन-अध्यापन पद्धतीतून ज्ञान ग्रहणातील एकात्मताही होय. चार भिंतीतील, केवळ वर्गातील, व्याख्यान पद्धतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला पुष्कळच मर्यादा असतात. अशा शिक्षणात केवळ संकल्पनांना प्रतिशब्द शिकवण्यावर भर असतो. या शिक्षणात अश्व म्हणजे काय तर घोडा, आणि घोडा म्हणजे काय तर अश्व अशा पद्धतीने शिक्षण होते, परंतु प्रत्यक्षातला घोडा कधीच दाखवलेला, पाहिलेला नसतो. तसेच केवळ आंबा दाखवून आंब्याची चव कधीच कळत नाही.