संधी नोकरीच्या : आयटी कंपन्यांमधील प्रशिक्षण

it-company-traning
it-company-traning

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व्हिस कंपन्यांमध्ये अभियांत्रिकी वा इतर कोर्सेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर भरती केले जातात. जॉइनिंगच्या अगोदर किंवा जॉइनिंगनंतर फ्रेशर्स कडून काय काय करवून घेतले जाते, कुठल्या टेक्नॉलॉजी, स्किल्सवर भर दिला जातो याची उत्सुकता फ्रेशर्सच्या मनात असते. 

विविध  कंपन्या जॉइनिंगनंतर फ्रेशर्सना साधारणपणे १० ते १५ आठवड्यांचे ट्रेनिंग देतात. बऱ्याचशा कंपन्या जॉइनिंगच्या आधीच ऑनलाइन पद्धतीने काही ट्रेनिंग मॉड्यूल्सवर विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतात. 

या ट्रेनिंगमध्ये कॉम्प्युटिंग बेसिक्स, प्रोग्रॅमिंग, सॉफ्ट स्किल्स व कंपनीतील शिष्टाचार, संस्कृती यावर प्रामुख्याने भर दिला जातो.

काही कंपन्या त्यांच्या गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षातच सिलॅबसमध्ये काही प्रमाणात त्यांना लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा भाग शिकवितात तर काही कंपन्या स्वतःचे इलेक्टिव्ह विषय संपूर्ण सिलॅबससहित कॉलेजेसला देतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती-तंत्रज्ञान कंपनीत फ्रेशर्सना दिले जाणारे ट्रेनिंग :

A)J2EE व Java 
DotNet, Java : Core and the advance with the frameworks like Spring and Hibernate

B)Infrastructure Management Services:
Linux, Networking, VMware Administration, Windows administration, SQL, Oracle DBA. 

C)Manual Testing

D)PL/SQL, SAP BO, TERADATA

E)V&V
कंपनीतील विविध Stream/Specialization खाली दिल्याप्रमाणे असतात :
SAP        Java 
Net         SAP BI
CRM        Mainframe

कंपन्यांच्या फ्रेशर्स ट्रेनिंगमध्ये खालील स्किलवर भर दिला जातो :
Time and Project Management
Computer Networks
Communication Skills
Coding Skills

प्रत्येक मॉड्युलनंतर परीक्षा असल्याने फ्रेशर्सना कमी वेळात मेहनत करून खूप गोष्टी शिकाव्या लागतात. बऱ्याच कंपन्या ट्रेनिंगनंतर एखाद्या प्रोजेक्टवर काम करायला लावतात. त्यामुळे फ्रेशर्स बऱ्यापैकी व्यग्र असतात. तशी मानसिक तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com