UPSC Success : वाईच्या शुभम वाईकरची यूपीएससीत गरुड झेप

Success Story : केंद्रीय पोलिस बलमध्ये निवड, कळमनुरीमध्ये मिरवणूक काढून स्वागत
वाईच्या शुभम वाईकरची केंद्रीय पोलिस बलमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून निवड झाली
वाईच्या शुभम वाईकरची केंद्रीय पोलिस बलमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून निवड झालीesakal
Updated on

Motivational : जिद्द व चिकाटीला कठोर परिश्रमाची जोड देत येथील युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. केंद्रीय पोलिस बलमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून निवड झालेल्या या युवकाचे नाव आहे शुभम वाईकर. या यशाबद्दल रविवारी (ता. ७) शहरातून मिरवणूक काढत शुभमचे स्वागत करण्यात आले.

तालुक्यातील वाई येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त मंडळ अधिकारी शेषराव वाईकर यांचा मुलगा शुभमचे प्राथमिक शिक्षण कळमनुरी येथील सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात झाले. तर दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयामधून त्याने पूर्ण केले. तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथून पूर्ण करीत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. शुभमने यूपीएससी स्पर्धा परीक्षेअंतर्गत सीएपीएफ परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मित्रमंडळीचे मार्गदर्शन, अभ्यासात सातत्य ठेवून त्याने तयारी करीत परीक्षा दिली.

वाईच्या शुभम वाईकरची केंद्रीय पोलिस बलमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून निवड झाली
Sunita Williams : जगाला सुनीता विल्यम्सच्या कॉलची प्रतीक्षा! उद्या रात्री पृथ्वीशी संवाद साधणार

तीन वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता शुभमने जिद्दीने चौथ्या प्रयत्नात ऑगस्ट २३ मध्ये दिलेल्या परीक्षेत यश मिळवले. शुक्रवारी (ता.५) निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत देशपातळीवर २८० रँक घेऊन शुभम उत्तीर्ण झाला. केंद्रीय पोलिस बलामध्ये उपविभागीय पोलस अधिकारी (डीवायएसपी) असिस्टंट कमांडंट या पदावर त्याला नेमणूक मिळणार आहे.

वाईच्या शुभम वाईकरची केंद्रीय पोलिस बलमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून निवड झाली
UPI Scams: UPI पेमेंट्स करताना टाळा 'या' चुका; अन्यथा होऊ शकतं इतकं मोठं नुकसान

या यशाबद्दल शहरात मिरवणूक काढून शुभमचे आई-वडिलांसह अभिनंदन केले. या मिरवणुकीमध्ये माजी आमदार डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते, शेषराव वाईकर, माजी सभापती अनिता सदाशिव खुडे, सुरेश धनवे, नागोराव बोलके, मोहनराव बोथीकर, सतीश तांबारे, दौलत धनवे यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.