डिकोडिंग कोडिंग... : असा निवडा क्लास !

Coding-Decoding
Coding-Decoding

संगणकावर कार्य करणे मुलांसाठी रोमांचक आहे. ते या तंत्रज्ञानासह मोठे झाले आहेत आणि गेल्या एका वर्षात त्यांनी त्यांच्या पालकांना संगणकावर मोठ्या प्रमाणात कार्य करताना पाहिले आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रोग्रामिंग आणि ‘एआय’बद्दल विस्ताराने सांगण्यात आले आहे. 

गेल्या वर्षभरात, अनेक कोडिंग कंपन्या वेगवेगळ्या किंमतींच्या श्रेणीत आल्या आहेत. आपण आपल्या मुलासाठी सर्वांत योग्य वर्ग कसा निवडाल? निर्णय घेताना तीन गोष्टी विचारात घ्याव्यात:

अभ्यासक्रम 
व्हर्च्युअल रिॲलिटी, गेम डेव्हलपमेंट, रोबोटिक्स व संगणक विज्ञानाचे क्षेत्र विस्तृत आहे. प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी काही मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. कॉम्प्यूटर सायन्समध्ये, व्हेरिएबल्स, लूप्स, लॉजिक, फंक्शन्स आणि क्लासेस यांसारख्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. या संकल्पना पाया म्हणून शिकवल्या जात आहेत की नाही आणि विद्यार्थी अभ्यासक्रमामध्ये पुढे जात असताना अडचणीची पातळी कायस आहे यावर एक नजर टाका. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक
आपल्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाची पार्श्वभूमी काय आहे, त्यांना प्रोग्रामिंगचा अनुभव आहे का, हे पाहा. मोठ्या मुलांना प्रोग्रामिंगचा बराचसा अनुभव असणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता असते. ते विद्यार्थ्यांशी चांगले संवाद साधू शकतात का?  मुलाने त्यांना अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्यास शिक्षक उत्तर देऊ शकेल काय?

शिक्षण पद्धती 
काही मुले एक-एका शिक्षकासह अधिक चांगले शिकतात. काही साथीदारांच्या एका छोट्या गटासह आणि शिक्षकांसह चांगले शिकतात. इतर कदाचित व्हिडिओ पाहणे आणि स्वतःच कोडिंग वापरण्यास प्राधान्य देतात, तर काहींना प्रोजेक्टचे आव्हान आवडते. 
या तीन मुद्द्यांचा विचार करा, त्याबद्दल आपल्या जोडीदाराबरोबर आणि मुलाशी चर्चा करा आणि आपल्या मुलासाठी योग्य निर्णय घ्या.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com